मनोज जरांगे कुणाचा करणार गेम? जातीय ध्रुवीकरणाला धार्मिक एकतेतून देणार शह, मुस्लीम धर्मगुरूंची भेट, काय केली चर्चा, काय झाली मसलत

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेपूर्वी बैठकांचा आणि भेटीचा धडाका लावला आहे. अंतरवाली सराटी राज्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्र होऊ पाहत आहे. मराठा आरक्षणाचं भांडवल करू पाहणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी आता एक मोठी खेळी खेळली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मोठी घडामोड घडली.

मनोज जरांगे कुणाचा करणार गेम? जातीय ध्रुवीकरणाला धार्मिक एकतेतून देणार शह, मुस्लीम धर्मगुरूंची भेट, काय केली चर्चा, काय झाली मसलत
मनोज जरांगेचा नवीन फॉर्म्युला काय?
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 9:18 AM

मराठा आरक्षणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेत हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला. अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जमीन कसली आहे. त्यांनी बैठकांचा आणि भेटीचा धडाका लावला आहे. अंतरवाली सराटी राज्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्र होऊ पाहत आहे. मराठा आरक्षणाचं आणि ओबीसी आंदोलनाचं भांडवल करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जरांगे पाटील यांची कायदा तज्ज्ञांशी चर्चा झाली तर दुसरीकडे जातीय ध्रुवीकरणाला शह देण्यासाठी त्यांनी धार्मिक एकोप्यावर भर दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगरात मोठी घडामोड घडली.

मुस्लीम विद्वान नोमानी यांची घेतली भेट

मनोज जरांगे पाटील आणि खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली. सज्जाद नोमानी भारतीय इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याचवेळी ते मुस्लीम आरक्षणाचा पण मुद्दा ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा ठाकले तर राज्यातील चित्र बदलू शकते.

हे सुद्धा वाचा

…म्हणून घेतली भेट

आता पडघम कशाचे आहेत हे सर्वांना माहित आहे गोरगरीबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे सामान्य जनता अडचणीत सापडले आहे तेव्हा आपण चर्चा केली पाहिजे जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे.

नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जेष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक वाटलं म्हणून मी त्यांचा मार्गदर्शन घेतलं, असं जरांगे पाटील म्हणाले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो तिथे जात लावून चालत नाही खेचून आणायचा आहे त्यामुळे मानवतावाद जागा ठेवणे महत्त्वाचा आहे नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं प्रचंड मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकतं, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

ते प्रचंड आजारी आहेत त्यांना आंतरवाली मध्ये येता येत नव्हतं त्यांची धडपड होती मात्र त्यांना येता आलं नाही त्यामुळे मी इथपर्यंत आलो एक-दोन दिवस चर्चा होऊन पुढचा निर्णय होईल माणुसकीच्या नात्याने आम्ही भेट घेतली आहे त्यांना अन्यायाची चीड आहे समाजाचा आणि गोर गरीबांचा मान सन्मान वाढवणं गरजेचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?
राजधानीत बंगला सुनेत्रा पवारांना पण दिल्लीचं बळ अजितदादांना?.
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?
आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ?.
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका...
अजितदादा शरद पवार यांना भेटले, कारण काय? सेना म्हणतेय, आम्हाला धोका....
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.