मुंबईत पुन्हा पोलिसाचा ‘कोरोना’मुळे बळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत (Police Death due to Corona) आहेत.

मुंबईत पुन्हा पोलिसाचा 'कोरोना'मुळे बळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत (Police Death due to Corona) आहेत. मुंबईत कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत (Police Death due to Corona) होते.

दरम्यान याआधी मुंबई पोलीस दलात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पोलीस कर्मचारी 50 वयापेक्षा जास्त वयाचे होते.

दिवसेंदिवस मुंबई पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत 700 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार, पुणे एक आणि सोलापुरातील एक असा समावेश आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

कोरोनाने मृत्यू झालेलल्या पोलीस कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत

कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या : 

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत, मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI