AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता जयंत पाटलांच्या मुलाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’, लसीचे पैसे CM फंडात!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे

आता जयंत पाटलांच्या मुलाकडून 'करेक्ट कार्यक्रम', लसीचे पैसे CM फंडात!
Pratik Jayant Patil
| Updated on: Apr 28, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Maharashtra Chief Ministers Relief Fund) मदत म्हणून देऊ. इतकंच नाही तर स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय प्रतीक पाटील यांनी घेतला. (Pratik Patil son of Minister Jayant Patil decided to donate vaccination amount to Maharashtra Chief Ministers Relief Fund)

महाराष्ट्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या किमती 400 ते 600 रुपये आहेत. मात्र राज्य सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती देताना 6500 कोटी रुपये लसीकरणावर खर्च करणार असल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत आधीच राज्य सरकारची परिस्थिती बिकट असल्यामुळे, आता अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत.

प्रतीक पाटील यांचं आवाहन 

ज्यांना विकत लस घेणे परवड आहे, ते नागरिक लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत. त्यामध्ये आता प्रतीक पाटील यांचीही भर पडली आहे. प्रतीक पाटील यांनी राज्यातील तरुणांनाही याबाबत आवाहन केलं आहे.

“आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे. देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेत आहे”, असं प्रतीक पाटील म्हणाले.

प्रतीक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत.

महाराष्ट्रात मोफत लसीकरण 

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.  पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. (Maharashtra Free Corona Vaccination Drive 18 plus Citizens to get free COVID vaccine) महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे.

VIDEO : लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

संबंधित बातम्या   

Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात

(Pratik Patil son of Minister Jayant Patil decided to donate vaccination amount to Maharashtra Chief Ministers Relief Fund)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.