AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. (Maharashtra Lockdown likely to extend )

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय
CM Uddhav Thackeray
| Updated on: Apr 28, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. एक मेपर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्याने वाढण्याची चिन्हं आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी त्यासंदर्भात संकेत दिले होते. (Maharashtra Lockdown likely to extend till 15th May Cabinet Ministry Decision)

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

मोफत लसीकरणाची चिन्हं

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असं सांगतानाच आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Lockdown likely to extend till 15th May Cabinet Ministry Decision)

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

1 मे रोजी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नाही?; वाचा, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

(Maharashtra Lockdown likely to extend till 15th May Cabinet Ministry Decision)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.