Bhanushali Building Collapse | सरकारने योग्य नियोजन न केल्याने दुर्घटना : प्रवीण दरेकर

आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही भानुशाली इमारत येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

Bhanushali Building Collapse | सरकारने योग्य नियोजन न केल्याने दुर्घटना : प्रवीण दरेकर
Nupur Chilkulwar

|

Jul 17, 2020 | 4:15 PM

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली (Pravin Darekar On Bhanushali Building Collapse). या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 24 जणांना ढिगाऱ्याघालून सुखरुप काढण्यात आलं आहे. या घटनेला आता तब्बल 23 तास उलटून गेले आहेत. कालपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही भानुशाली इमारत येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकरांनी मुंबई महानगर पालिका आणि सरकारच्या नियोजनेवर टीका केली आहे (Pravin Darekar On Bhanushali Building Collapse).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

““पाऊस अचानक येत नाही, तो ठरलेला असतो. पण एक पावसाळा असा गेला नाही, की ज्या पावसाळ्यात इमारत कोसळत नाही किंवा कुणाचा मृत्यू झाला नाही. मनपा, म्हाडाला एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या. गांभिर्याने जी काळजी घ्यायला हवी, ती झाली नाही. इंटिग्रेटेड प्रोग्राम बनवा. मुंबई उपनगरात ज्या धोकादायक इमारती आहेत, त्याबाबत आढावा घ्या. पुनर्वसनाची व्यवस्था करा. मुंबई मनपा, म्हाडा आणि सरकारने एका आठवड्यात हे जाहीर करावं. या संदर्भात नियोजन विहायला हवं होतं, पण सरकारने ते केलं नाही. सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला हवी होती, ती घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने हे सगळं घडलं”, अशी टीका प्रवीण दरेकरांनी सरकार आणि मनपावर केली आहे.

Pravin Darekar On Bhanushali Building Collapse

भानुशाली इमारत दुर्घटना

मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. धोकादायक असलेल्या या इमारतीचा 40 टक्के भाग काल (गुरुवार 16 जुलै) संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 24 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्याला गती मिळावी म्हणून एनडीआरएफचं पथकंही घटनास्थळा दाखल झालं. तसेच, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना शोधण्यासाठी एनडीआरएफकडून श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. शेरु आणि उदय या दोघा श्वानांकडून बचावकार्यात मदत सुरु आहे.

याशिवाय, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Pravin Darekar On Bhanushali Building Collapse

संबंधित बातम्या :

Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें