खासदार संभाजी छत्रपतींना राजीनामा मागितला नाही, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही: प्रवीण दरेकर

माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पुनरुच्चार खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केला. (pravin darekar reaction on Sambhaji Chhatrapati's press conference)

खासदार संभाजी छत्रपतींना राजीनामा मागितला नाही, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही: प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.

मुंबई: माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पुनरुच्चार खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केला. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी छत्रपतींना कुणीही राजीनामा मागितला नाही. राजीनाम्याने प्रश्नही सुटणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. (pravin darekar reaction on Sambhaji Chhatrapati’s press conference)

खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली रोखठोक भूमिका सांगतानाच पुढची दिशाही स्पष्ट केली. त्याबाबत प्रवीण दरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे भाजपवर नाराज नाही. राजेंकडे कोणीही राजीनामा मागितला नाही. राजीनामा दिल्याने प्रश्नही सुटत नाही. हा उपाय असूच शकत नाही. मात्र, राजीनामा द्यावा की नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाच्या नावाने कोणीही राजकारण करू नये, असं दरेकर म्हणाले.

संभाजी छत्रपतींच्या आंदोलनाला पाठिंबा

संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबतही दरेकर यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पक्ष काढावा की काढू नये किंवा आणखी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची सार्वत्रिक भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाचे नेते काम करत आहेत. भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. आम्ही संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनालाही पाठिंबा देत आहोत. पक्षविरहीत मराठा समाजाची मोट बांधली जावी, असंही ते म्हणाले.

चार पाच मागण्या चांगल्या

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार योग्य प्रकारे पावले उचलत आहे. राज्यपालांना पत्रं देऊन उपयोग नाही. काहीजण एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. त्याने केंद्राच्या आणि राज्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या गोष्टी लोकांसमोर येतील, असं ते म्हणाले. राजेंच्या चार पाच मागण्या चांगल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अधिवेशन घेतलं जावं ही त्यांची मागणी योग्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (pravin darekar reaction on Sambhaji Chhatrapati’s press conference)

 

संबंधित बातम्या:

ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन

आंदोलनाला अजून 9 दिवस आहेत, मार्ग निघेल; अजित पवारांचे संकेत

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे 3 पर्याय किती उपयुक्त? जाणून घ्या घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मत

(pravin darekar reaction on Sambhaji Chhatrapati’s press conference)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI