राज ठाकरेंना टेनिस खेळताना दुखापत, हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

((Raj Thackeray Hairline Fracture while playing Tennis)

राज ठाकरेंना टेनिस खेळताना दुखापत, हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे हे काल (सोमवारी) संध्याकाळी टेनिस खेळत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावलं आहे. (Raj Thackeray Hairline Fracture while playing Tennis)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कला आणि क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहे. स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. टेनिसचा आनंद घेतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते. ‘कृष्णकुंज’वर राहणाऱ्या राज ठाकरेंसाठी शिवाजी पार्क हे जणू अंगणच. त्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून राज ठाकरे सध्या लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेतात.

राज ठाकरे यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या हाताचा सपोर्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं.

टेनिस एल्बो म्हणजे काय?

कोपरापासून दंडाच्या दिशेने जोडलेले स्नायू सुजले तर मनगट उचलण्यासाठी, किंवा हालचाल करण्यासाठी वेदनादायी ठरतं. मनगटाचा वापर होणारी साधी कामं करतानाही अडचणी येतात. टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखे खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यावरुनच या दुखापतीला टेनिस एल्बो म्हटलं जातं

संबंधित बातम्या :

राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का? विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

(Raj Thackeray Hairline Fracture while playing Tennis)

Published On - 12:33 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI