AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंचा सवाल; व्हायरल रिपोर्टर मुलींनी दिलं थक्क करणारं उत्तर

कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांचे रिपोर्टिंग करून व्हायरल झालेल्या मुलींनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी त्यांना पत्रकार होण्याबद्दल विचारले असता, त्यांनी 'नाही' असे उत्तर दिले. स्टेनो, युट्यूबर आणि स्केच आर्टिस्ट बनण्याची त्यांची इच्छा आहे. राज ठाकरेंनी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांचे शिक्षण महत्त्वाचे ठरेल.

मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंचा सवाल; व्हायरल रिपोर्टर मुलींनी दिलं थक्क करणारं उत्तर
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 12:30 PM
Share

आपण आज आलो आहोत, कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर… तर आमची रिपोर्टर ज्योत्सना या रस्त्यांबद्दल काय सांगेल?…. असा प्रश्न विचारणारा आवाज अवघ्या महाराष्ट्राच्या कानावर आला. शाळकरी मुली छत्रीचा माईक करून खड्ड्यांचं रिपोर्टिंग करतानाचा अवघ्या 47 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. मुलींचं कव्हरेज केवळ कोंदविडे गावापुरतं मर्यादित असलं तरी राज्यभरातील खड्ड्यांनाच त्यांनी वाचा फोडली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू झाली. या व्हिडीओने मुली घराघरात पोहोचल्या. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या मुलींना भेटण्याचा मोह आवरला नाही. राज ठाकरे यांनी या मुलींना भेटायला बोलावलं. त्यांचा सन्मान केला. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना तुम्ही पत्रकार बनणार का? असा सवाल केला. पण या मुलींचं उत्तर नाही असं होतं. या मुलींनी थक्क करणारं उत्तर दिलं.

रायगड जिल्ह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत रिपोर्टिंग करून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘व्हायरल गर्ल्स’ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ आज आल्या. यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली. कोण कोणत्या वर्गात शिकतं याची माहिती घेतली. त्यांच्या कौटुंबिक स्थितीची माहिती घेतली. गावाची माहिती घेतली. शाळेच्या अवस्थेचीही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तीन ते चार तास वाया जातात

यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना काही प्रश्न विचारले. तुम्ही मोठं होऊन कोण होणार? रिपोर्टर होणार आहात का? असं राज ठाकरे यांनी या मुलींना विचारलं. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. एकीने स्टेनो होणार असल्याचं सांगितलं. दुसरीने युट्यूबर तर तिसरीने स्केच आर्टिस्ट होणार असल्याचं राज ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना तुम्ही अभ्यास करताय ना? असा दुसरा प्रश्न केला. त्यावर आम्ही अभ्यास करतो. पण आमचे तीन ते चार तास असेच वाया जातात असं त्या म्हणाल्या. व्हिडीओ केल्यापासून अभ्यास होत नाहीये. अनेक लोक भेटायला येत आहेत. 3-4 तास पहिले मुलाखत देण्यातच जात आहेत, असं त्या म्हणाल्या.

मुलाखती बंद करा, अभ्यासाला लागा

त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना इंटरव्ह्यू बंद करण्याचा आणि अभ्यासाला लागण्याचा सल्ला दिला. आता मुलाखती देणं बंद करा. अभ्यास महत्त्वाचा आहे, असं सांगतानाच तुम्हाला काहीही लागलं तर मला कळवा. आम्ही तुमच्या मदतीला असू, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं.

राज साहेबांनी बोलावलं, बरं वाटलं

त्यानंतर या मुलींनी मीडियाशी संवाद साधला. मला स्टेनो व्हायचं आहे. हिला युट्यूबर तर दुसरीला स्केच आर्टिस्ट व्हायचं आहे. आम्ही आता इयत्ता 10 वीला आहोता. आम्हाला कोणत्याच नेत्याने भेटायला बोलावलं नव्हतं. राज साहेबांनी बोलावलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. खूप बरं वाटलं, असं या मुली म्हणाल्या.

कुणी तरी व्हिडीओ डाऊनलोड केला अन्…

आमचा व्हिडीओ व्हायरल कसा झाला माहीत नाही. आमच्या मित्राने व्हाटसअपला स्टेट्सला ठेवले होते. कुणी तरी डाऊनलोड करून व्हायरल केलं. राज ठाकरेंनी व्हिडिओ पाहून दखल घेतली. त्यांनी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही आधी शिक्षण घेऊ. राज साहेबांनी आमचा सन्मान केला, त्यामुळे बरं वाटलं, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...