“शिवरायांचे खरे गुरु शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ”; राष्ट्रवादीनं राजनाथ सिंहाचा दावा खोडला, शिवचरित्रही पाठवलं

मुंबईतही घाटकोपर परिसरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

"शिवरायांचे खरे गुरु शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ"; राष्ट्रवादीनं राजनाथ सिंहाचा दावा खोडला, शिवचरित्रही पाठवलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असा इतिहासाचा दाखला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला होता. पुणे येथील राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली होती. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात आला होता. मुंबईतही घाटकोपर परिसरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

पोस्टानं शिवचरित्र पाठवलं

राजनाथ सिंह यांचा निषेध करत शिवरायांचे खरे गुरू शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. संरक्षणमंत्र्यांच्या इतिहासाचे दाखले राष्ट्रवादीने खोडून काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने संरक्षणमंत्र्यांना पोस्टाने शिवचरित्र पाठवलं आहे. यावेळी जय जय जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देताना राजनाथ सिंह यांनी दिलेला खोटा ऐतिहासिक दाखला राष्ट्रवादीने खोडून काढला.

शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ गुरु होत्या

राष्ट्रवादीने एक अभिनव आंदोलन छेडताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या खोट्या इतिहासाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरूस्थानी फक्त त्यांचे वडील शहाजीराजे, राजमाता जिजाऊचं होत्या. त्यांनीच त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा तसेच कला आणि राजकारणाचे धडे दिले. त्यांना सर्व विद्यांत निपुण केले. महात्मा जोतिराव फुले, शाहीर अमरशेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी इतिहासाची जी काही मांडणी केली आहे. त्यात याचे सत्य आणि वास्तवावर आधारित दाखले सापडतात, असे अ‍ॅड.अमोल मातेले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राजनाथ सिंह काय म्हणाले होते?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यता अमोल कोल्हे यांनी वर्तवली.

इतर बातम्या:

रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे शिवराय राष्ट्रनायक, राजनाथ सिंहांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून निषेध

राजनाथ सिंह म्हणाले, शिवाजीराजांना खेळाचं शिक्षण दादोजी कोंडदेव-रामदासांनी दिलं; संभाजी ब्रिगेड-कोल्हेंकडून माफीची मागणी

Rajnath Singh Controversial Statement on Shivaji Maharaj Mumbai NCP will sent books to him about biography Shivaji Maharaj

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI