मुंबईत 14 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार, बॉक्सिंग प्रशिक्षक गजाआड

ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती. | Rape Boxing coach

मुंबईत 14 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार, बॉक्सिंग प्रशिक्षक गजाआड
ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती.

मुंबई: मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी 14 वर्षांची असून पोलिसांनी याप्रकरणात बॉक्सिंग प्रशिक्षकाला (वय 30) अटक केली आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. (Boxing coach rape on student in Mumbai)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी या प्रशिक्षकाच्या क्लासमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी या मुलीची तब्येत बिघडली होती. तेव्हा हा प्रशिक्षक मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी घेऊन गेला. यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केले.

ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती. मात्र, या मुलीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर या प्रशिक्षकाचे बिंग फुटले. पोलिसांनी बुधवारी रात्री टिळक नगर येथून या प्रशिक्षकाला ताब्यात घेतले. पीडित मुलीवर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बॉक्सिंग कोचविरोधात कलम 376, 376 (3), 506 आणि पोक्सो कलम 4,6,8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, महाबळेश्वर हादरलं

शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे.

नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. यानंतर त्या आरोपीला नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

(Boxing coach rape on student in Mumbai)

Published On - 10:16 am, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI