पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्याचा निर्णय टिकणार नाही : प्रकाश आंबेडकर

पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्याचा निर्णय टिकणार नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : रावी नदीचं भारताच्या वाट्याचं जे पाणी पाकिस्तानला जातं, ते ते पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय भारताने घेतलाय. पण हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नाही, असा दावा भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. शिवाय परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पाकिस्तान हा भारताच्या पुढे असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणाही साधलाय. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : रावी नदीचं भारताच्या वाट्याचं जे पाणी पाकिस्तानला जातं, ते ते पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय भारताने घेतलाय. पण हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नाही, असा दावा भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. शिवाय परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत पाकिस्तान हा भारताच्या पुढे असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणाही साधलाय.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय. पश्चिम खोऱ्यातील रावी नदीचं पाकिस्तानला जाणारं भारताच्या वाट्याचं पाणी पूर्णपणे वळवलं जाणार आहे. या पाण्याचा वापर जम्मू काश्मीर आणि पंजाबसाठी केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सिंधू नदी खोऱ्याचे दोन भाग आहेत. यापैकी पश्चिम खोऱ्याचं पाणी पाकिस्तानला, तर पूर्व खोऱ्याचं पाणी भारताला मिळतं.

पाणी रोखण्यासाठी बंधाऱ्याचं कामही सुरु करण्यात आलंय. शाहपूर-कांडी नदीवर मंजुरी देण्यात आलेल्या या बंधाऱ्याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आलंय. पाकिस्तानला सध्या तीन नद्यांचं पाणी दिलं जातं. पण आणखी बंधारे बांधून हे पाणी वळवलं जाणार असल्याचंही गडकरींनी जाहीर केलंय.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आव्हान देता येईल का?

कदाचित याचं उत्तर नाही असं आहे. कारण, सिंधू नदी करारानुसार, सतलज, रावी आणि व्यास या पूर्व खोऱ्यातल्या नद्या भारताच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या नद्यांचं हवं तेवढं पाणी वापरण्याचा अधिकार भारताला आहे. सिंधूच्या पश्चिम खोऱ्यातल्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी वापरण्यासाठी भारतावर काही मर्यादा आहेत. कारण, या नद्यांचं पाणी पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे. रावी नदीचं पाणी भारताने अडवल्यास तो भारताचा अधिकार आहे. त्यामुळे पाकिस्तानला याविरोधात कुठेही दाद मागता येणार नाही.

काय आहे सिंधू नदी करार?

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीत या करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक बँकेने या करारासाठी मध्यस्थी केलेली आहे.  या करारानुसार, सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलज, व्यास आणि रावी या नद्या पूर्व खोऱ्यात, तर सिंधू, झेलम, चिनाब या नद्या पश्चिम खोऱ्यात येतात. पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे. पश्चिम खोऱ्यातल्या पाण्यावर काही बंधनं आहेत. कारण, पश्चिम खोऱ्यातलं पाणी पाकिस्तानला जातं.

भारताने पाकिस्तानसोबत पाण्यासाठी आतापर्यंत कधीही वाद घातला नाही. कारण, प्रश्न पाण्याचा आहे. उदारपणा दाखवत भारताने मोठ्या मनाने पाकिस्तानला पाणी दिलं. आपण बांगलादेशलाही पाणी देतो. पण ज्या देशाचं पाणी आपण पितो त्याच देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला पाणी देऊ नये, अशी भूमिका याअगोदर अनेक राज्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी घेतलेली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें