AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन

ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक, संपादक आणि डाव्या चळवळीतील बिनीचे शिलेदार सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. (Renowned Marathi poet and social activist satish kalsekar passes away)

ज्येष्ठ कवी, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं निधन
satish kalsekar
| Updated on: Jul 24, 2021 | 2:12 PM
Share

मुंबई: महानगरीय जीवनातील भावविश्वांना आपल्या कवितेतून वाट मोकळी करून देणारे ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक, संपादक आणि डाव्या चळवळीतील बिनीचे शिलेदार सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. (Renowned Marathi poet and social activist satish kalsekar passes away)

सतीश काळसेकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील काळसे येथे झाला. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. मुंबईतून त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी काही काळ ज्ञानदूत मासिकात आणि टाईम्स ऑफ इंडियात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ बडोदामध्येही नोकरी केली.

‘इंद्रियोपनिषद्’ पहिला काव्यसंग्रह

त्यांचा ‘इंद्रियोपनिषद्’ हा पहिला काव्यसंग्रह 1971मध्ये प्रकाशित झाला होता. त्यानंतर ‘साक्षात’, ‘विलंबित’ आणि ‘कविता: लेनिनसाठी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी प्रसिद्ध हिंदी कवी अरुण कमल यांच्या ‘नव्या वसाहतीत’ या कवितासंग्रहाचा अनुवाद केला होता.

साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव

त्यांचे ‘वाचणाऱ्यांची रोजनिशी’ आणि ‘पायपीट’ हे दोन गद्यलेखन संग्रह प्रकाशित आहे. त्यातील ‘वाचणाऱ्यांची रोजनिशी’ या पुस्तकाला त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. वाचणाऱ्यांची रोजनिशीतून त्यांनी जगभरातील गाजलेल्या पुस्तकांचा परिचय वाचकांना करून दिला आहे. त्यांनी हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी आणि पंजाबीसह इतर भाषांमधील कवितांचे मराठीत अनुवाद केले आहेत. त्यांनी देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या कवींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला आहे.

कार्यकर्ताही

काळसेकर केवळ कवी, लेखक, स्तंभलेखक आणि अनुवादकच नव्हते तर ते डाव्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्तेही होते. त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन असो की भाकपा असो प्रत्येक डाव्या संघटनेत त्यांचा सहभाग असे.

पुस्तकांसाठी घर घेणारा अवलिया

काळसेकर हे कवी, लेखक होते तसेच ते घोर वाचकही होते. त्यांचं वाचन दांडगं होतं. ग्रंथसंग्रह अफाट होता. तो इतका की मुंबईच्या घरात पुस्तकं ठेवायला जागा नव्हती म्हणून त्यांनी थेट पेणला पुस्तकांसाठी घरं बांधलं होतं. त्यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग दिसून येतो.

पुरस्कार

काळसेकरांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, कवीवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, राज्य शासनाचा पुरस्कार, कैफी आझमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.

साहित्यातील विद्रोही व्यक्तिमत्त्व: पवार

‘साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, साहित्य चळवळीतलं विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, मराठी साहित्यविश्वात लीलया मुशाफिरी करणाऱ्या सतीश काळसेकरांनी लघुनियतकालिक चळवळीच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व समृद्ध केलं. राज्यातल्या लेखक-वाचकांना एकत्र आणलं. वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी साहित्यातून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. संवादावर विश्वास असलेले, माणसं जोडणारं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या सहवासात आलेले, त्यांनी घडवलेले अनेक जण आज साहित्य, पत्रकारिता, समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान देत आहेत. सतीश काळसेकर यांचं निधन महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीची मोठी हानी आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. (Renowned Marathi poet and social activist satish kalsekar passes away)

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

(Renowned Marathi poet and social activist satish kalsekar passes away)

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.