AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना

'राष्ट्रवादी आपल्यासोबत' या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे.

राष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना
'राष्ट्रवादी आपल्यासोबत' या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे.
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : ‘राष्ट्रवादी आपल्यासोबत’ या अभियानामार्फत महाडच्या आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना झाला आहे. खालापूरवरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मदतीचा टेम्पो महाडच्या दिशेने पाठवला. राज्याचा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत असताना आपल्या मदतीची त्यांना गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी मदतीचा टेम्पो महाडकडे पाठवला.

धान्य, कपडे, ब्लँकेट, औषध, सॅनेटरी, फुड पॅकेट्स, बिस्किट, दूध, मिनरल वॉटर अशी मदत पाठवण्यात आलेली आहे. महाडमध्ये गेल्यानंतर स्थानिक सांगतील त्या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाईल, असं राष्ट्रवादी युवक काँँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

राष्ट्रवादी आपल्या सोबत अभियान…

कोकण आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पावसाने रौद्र रूप धारण करत थैमान घातलं आहे. आपल्या राज्याचा हा समृद्ध भाग आज प्रचंड अडचणीत आणि संकटात सापडला आहे. ही वेळ आहे आता आपल्या बाह्या सरसावण्याची… कोकण आणि पूरग्रस्त बांधवांना मदतीला धावून जायची… महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि हितचिंतकांनी आपल्या कोकण भूमी साठी कंबर कसायची आहे.

आपल्या बांधवांवरचं संकट आपल्या खांदयावर घेऊयात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की कोकण आणि आसपासच्या परिसरात नागरिकांना शक्य त्या मदतीसाठी आपण तयारीला लागा… आपल्या बांधवांवर आलेल्या संकटाला आपण आता आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करूयात… यासाठी आपण आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यामार्फत ‘राष्ट्रवादी आपल्यासोबत’ हे अभियान राबवत आहोत या माध्यमातून आपण अन्नधान्य, औषधे, ब्लॅंकेट आणि इतर गरजेच्या वस्तूंची किट बनवून गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

सरकारकडून आपत्तीग्रस्तांना मदत

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ पुरवण्याचे आदेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर, दुसरीकडे शिवभोजन थाळ्यांची संख्या दुप्पट करण्याचे आदेश दिल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं.

पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ज्या नागरिकांनी गहू नको त्यांना तांदूळ देणार असल्याचंही भुजबळ म्हणाले . 5 किलो डाळ देखील देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं असून यासंदर्भातील आदेश जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांन सांगितलं.

(first tempo of helping for the disaster people from the NCP was sent towards Mahad)

हे ही वाचा :

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.