Rohan Aher : त्यानं मला पेट्रोल आणायला सांगितलं नि….थरारक नाट्याचा साक्षीदार रोहन आहेरचा दावा काय, अंगावर येईल काटा
Pawai Hostage Case : काल पवई येथील आर.के. स्टुडिओत ओलीस नाट्याचा थरार सर्वांनी पाहिला. रोहित आर्या याने 17 मुलांसह दोघांना ओलीस ठेवले होते. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तडक कारवाई करत रोहितचा एनकाऊंटर केला. या घटनेच्या साक्षीदाराने तो थरार कथन केला.

Rohan Aher on Rohit Aarya : 17 चिमुरड्यांना ओलीस ठेवण्याचा थरार काल पवईतील आर. के. स्टुडिओत घडला. काही मागण्यांसाठी रोहित आर्या याने मुलांना बंधक केले. त्यांच्या जीवाला धोका पाहता पोलिसांनी धाडसी कारवाई केली. त्यात एनकाऊंटरमध्ये रोहित हा ठार झाला. त्याच्या छातीला गोळी लागली. या थरार नाट्याचा साक्षीदार रोहन आहेर हा आहे. त्याने हा संपूर्ण घटनाक्रम कथित केला. त्याने त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. रोहितची मनस्थिती त्यावेळी काय होती. त्याने काय चाल खेळली याची ही माहिती…
रोहित आर्याचा मास्टरप्लॅन
रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केला होता. त्याने वेळेवर हे ओलीस नाट्य घडवलेले नव्हते. तर त्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात अगोदरच होता. ऑडिशन करताना आपल्याला मुलांना किडनॅप करतानाचा सिन शूट करायचा आहे हे त्याने प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितल होतं. रोहित आर्याने जस्टडायलवरून हा आर ए स्टूडियो बुक केला होता. आर्या सुरुवातीपासूनच मुलांना ओलीस ठेवण्याचा कट रचत होता पण त्याचा स्वभाव पाहता संशय आला नाही असा खुलासा ऑडिशनचा प्रोजेक्ट मॅनेजर रोहन आहेर याने केला.
ओलीस नाट्याची ए टू झेड कहाणी
रोहित आर्याने स्टुडिओत स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते आणि त्याचा एक्सेस स्वतःच्या फोनमध्ये घेतला होता. स्टुडिओच्या बाहेर जिन्यावरही आर्याने सीसीटीव्ही बसवले होते. स्टुडिओत पेट्रोल, रबर सोल्युशन असे ज्वलनशील पदार्थ आर्याने आणून ठेवले होते. ओलीस ठेवताना ४ मुलाना आर्याने एका खोलीत डांबल होत त्यांच्यासमोर एक कपडा टाकून त्यावर रबर सोल्युशन ओतलं आणि मग लायटर घेऊन पेटवून देण्याची धमकी दिली होती.
रोहन आहेर वाचवायला पुढे जात असताना तू पुढे आला तर मुलांना पेटवून देईन अशी धमकी आर्याने दिली होती. आर्याने स्टुडिओच्या काही दरवज्यांना वेल्डिंगही करून घेतलं होत ज्याने दरवाजे भक्कमपणे लॉक राहू शकतील. आर्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर रोहन आहेरने पालकांना अलर्ट केल आणि पोलिसांना बोलावा असा निरोप दिला.
रोहन आहेरने पोलिसांचे ऑपरेशन सुरू असताना मुलांना बाहेर काढण्यात मदत केली ज्यात काच लागून तो जखमीही झालाय. मला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे त्यांनी माझी फसवणूक केलीय माझे पैसे खाल्ले असा आरोप आर्या जोरजोरात ओरडून करत असल्याचेही रोहनने सांगितलं. रोहनने स्टुडिओतला सगळा धक्कादायक घटनाक्रम सांगितला.
एक दिवस वाढवला, त्याच्या मनात काय?
रोहित आर्या याने यापूर्वी स्वच्छता दूत हा कार्यक्रम राज्यातील शाळांमध्ये राबवला होता. त्यासंबंधीचे व्हॉट्सॲप ग्रुप होते. त्यातूनच त्याने विद्यार्थ्यांची निवड केली होती. तर मुलांना कॅमेऱ्याचं प्रशिक्षण आणि शूटसंबंधीची माहिती रोहन आणि त्याच्यासोबतच्या ज्येष्ठ कलाकारांनी दिली होती. 29 ऑक्टोबरपर्यंतच आर. के. स्टुडिओ बुक केलेला होता. मग रोहितने त्याची मुदत एक दिवसासाठी वाढवली. काल सकाळी त्याने रोहनला मॅसेज केला आणि पाच लिटर पेट्रोल सोबत आणण्यास तसेच दिवाळीचे फटाके आणण्यास सांगितले. फटाके हा शुटिंगचा भाग असल्याने रोहनने ते आणले. पण स्टुडिओ आणि मुलं असताना पेट्रोल त्याने सोबत नेले नाही. फ्लोअरवर पोहचल्यावर रोहितने कुणालाच स्टुडिओत जाण्यास बंदी घातली होती. मग त्याने आग दाखवायची असल्याचा कांगावा केला. आर्ट डिरेक्शनची टीम होती. मग रबर सोल्युशन्स आणि कपडे रोहितकडे होते. त्याचाच वापर पुढे या ओलिस नाट्यासाठी रोहितने वापर केला.
