AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त नाही, तर झोलयुक्त शिवार योजना, चौकशी अहवालाचं स्वागत : सचिन सावंत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी यांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेला झोलयुक्त शिवार योजना म्हणत त्याच्या चौकशी अहवालाचं स्वागत केलंय.

जलयुक्त नाही, तर झोलयुक्त शिवार योजना, चौकशी अहवालाचं स्वागत : सचिन सावंत
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी यांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेला झोलयुक्त शिवार योजना म्हणत त्याच्या चौकशी अहवालाचं स्वागत केलंय. “या अहवालातून 900 कामांची लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून व 100 कामांची विभागीय चौकशीची शिफारस केली आहे. यातून कॅगपाठोपाठ राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीनेही जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले. या झोलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत गेले पाहिजे,” असं मत सचिन सावंत यांनी व्यक्ते केलं.

सचिन सावंत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला.”

“योजना भ्रष्टाचारग्रस्त आणि भाजपाच्या बगलबच्चे व कंत्राटदारांसाठी कुरण बनली”

“जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट्य पावसाचे पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूभर्गातील पाण्याच्या पातळीत व सिंचन क्षेत्रात वाढ करणे तसेच पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे असे होते. या सर्व उद्दिष्टांवर ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. काँग्रेसने 2015 पासूनच ही योजना भ्रष्टाचारग्रस्त आणि भाजपाच्या बगलबच्चे व कंत्राटदारांसाठी कुरण बनल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या योजनेबदद्ल करण्यात आलेले सर्व दावे फडणवीस सरकार असतानाच पोकळ निघाले होते,” असंही सावंत यांनी नमूद केलं.

“अहवालानुसार एकूण 31,015 गावांत पाण्याची पातळी खोल गेली”

सचिन सावंत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 हजार गावे या योजनेमुळे दुष्काळमुक्त झाली आणि अजून 9 हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत असे विधान केले. आठच दिवसांत ही सर्व तथाकथित दुष्काळमुक्त गावे तत्कालीन सरकारला दुष्काळयुक्त म्हणून जाहीर करावी लागली होती. जलयुक्त योजनेवर जवळपास 10 हजार कोटी रुपये खर्च करूनही 2019 च्या मे महिन्यात राज्यात 7 हजारांपेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. तसेच राज्यात 2018 च्या ‘भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या’ अहवालानुसार 252 तालुक्यांमध्ये 13,984 गावांत 1 मीटरपेक्षा अधिक भूजल पातळी खाली गेली होती. प्रत्यक्ष राज्यात त्याच अहवालानुसार एकूण 31,015 गावांत पाण्याची पातळी खोल गेली होती.”

“काँग्रेसने जलयुक्त योजना झोलयुक्त आहे हे निदर्शनास आणून दिलं”

“असे असतानाही फडणवीस सरकार जवळच्या ठेकेदारांना जगवण्यासाठी या योजनेचे गुणगान करत राहिले. ‘मी लाभार्थी’ या खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटी रूपयांची उधळण केली. आपल्याच भाजपा कार्यकर्त्यांना लाभार्थी दाखवले. काँग्रेसने जलयुक्त योजना झोलयुक्त आहे हे निदर्शनास आणून देऊन या योजनेतील कामं अशास्त्रीय पद्धतीने तसेच जेसीबी यंत्राने फक्त खड्डे खोदण्याचे काम झाले आणि त्यात पाणी साठण्याऐवजी फक्त गाळ साठला हे दाखवून दिले होते. अनेक कामांचे लेखापरीक्षण ही केले गेले नाही,” असंही सावंत यांनी सांगितलं.

आघाडी सरकारने या भ्रष्टाचारी योजनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आता सरकारला प्राप्त झाला असून लवकरच भाजपाच्या भ्रष्टाचारी बगलबच्चे व दोषी कंत्राटदारांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

राज्यात नवीन समीकरण घडत असताना पाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी; ठाकरे सरकारने मागवला अहवाल

‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश’, काँग्रेसचा गंभीर आरोप

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी

व्हिडीओ पाहा :

Sachin Sawant welcome inquiry report on Jalyukt Shivar Scheme corruption

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....