कोठडीतील सचिन वाझेंना सर्वात मोठा झटका, पोलीस सेवेतून अखेर बडतर्फ!

पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze dismissed) यांना अखेर पोलीस सेवेतून (Mumbai Police) बडतर्फ करण्यात आलं आहे.

कोठडीतील सचिन वाझेंना सर्वात मोठा झटका, पोलीस सेवेतून अखेर बडतर्फ!
सचिन वाझे
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:11 PM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू  (Mansukh Hiren) आणि अंबानी स्फोटकंप्रकरणात (Mukesh Ambani bomb scare) आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze dismissed) यांना अखेर पोलीस सेवेतून (Mumbai Police) बडतर्फ करण्यात आलं आहे. स्फोटके प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. याशिवाय लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Sachin Vaze dismissed from Police service Mumbai Police Commissioner Hemant Nagrale issued order in Mansukh Hiren Death case Ambani bomb scare )

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने (Police Inspector Sunil Mane) याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) केला होता.

स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग?

या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली.

सचिन वाझे आणि रियाझ काझींची न्यायालयीन कोठडी

अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सचिन वाझेनं कोर्टाकडे काही खाजगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्यास कोर्टाची परवानगी दिली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत रियाझ काझी?

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

संबंधित बातम्या:

विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा

सचिन वाझेनंतर आता सुनील मानेचीही कार जप्त, बोरिवलीतून लाल गाडी NIA च्या ताब्यात

पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बेड्या 

(Sachin Vaze dismissed from Police service Mumbai Police Commissioner Hemant Nagrale issued order in Mansukh Hiren Death case Ambani bomb scare )

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.