सचिन वाझेंवर आता ‘ईडी’ची वक्रृष्टी? महागड्या गाड्या, पैसं मोजण्याच्या मशीनमुळे आणखी गोत्यात

सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? | ED Sachin Vaze

सचिन वाझेंवर आता 'ईडी'ची वक्रृष्टी? महागड्या गाड्या, पैसं मोजण्याच्या मशीनमुळे आणखी गोत्यात
सचिन वाझेच्या वापरातील आऊटलँडर गाडी एनआयएकडून जप्त
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 11:29 AM

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) आता आणखीनच गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण, NIAच्या तपासात सचिन वाझे यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्यांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) वक्रदृष्टी वळाली आहे. (Sachin Waze may face ED probe now)

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ईडी’कडून आता सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची तपासणी होऊ शकते. अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांच्याकडून मर्सिडीज, प्राडो यासारख्या अलिशान गाड्यांचा वापर झाला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? सचिन वाझे यांनी गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवले होते?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे NIA सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या तपासाचे प्रकरण ‘ईडी’कडे देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (NIA) आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता.

ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहे. 100 कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze : NIA ने आतापर्यंत किती कार ताब्यात घेतल्या? पाहा भारदस्त कारची झलक PHOTO

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

मोठी बातमी: NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

(Sachin Waze may face ED probe now)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.