Sachin Vaze : NIA ने आतापर्यंत किती कार ताब्यात घेतल्या? पाहा भारदस्त कारची झलक PHOTO

NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे.

Mar 18, 2021 | 6:35 PM
सचिन पाटील

|

Mar 18, 2021 | 6:35 PM

 मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची झाडाझडती सुरु आहे.

1 / 7
NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे.  NIA च्या हाती हे घबाड लागलं आहे.

2 / 7
NIA ने आज दोन गाड्या ताब्यात घेतल्या. यामध्ये एक मर्सिडीज आणि एक ट्रॅडो कारचा समावेश आहे.  NIA ने आतापर्यंत ताब्यात घेतलेली ही पाचवी कार आहे.

3 / 7
सर्वात आधी NIA ने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली होती. त्यानंतर स्फोटकांजवळ CCTV मध्ये दिसलेली इनोव्हा कार ताब्यात घेतली. त्या इनोव्हा कारच्या चौकशीदरम्यान NIA ने सचिन वाझे यांना अटक केली.

4 / 7
सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान मर्सिडीज कारची माहिती मिळाली. मग NIA ने ती मर्सिडीज ताब्यात घेतली. अशा एकूण पाच गाड्या आतापर्यंत ताब्यात घेतल्या आहेत.

5 / 7
NIA ने जी टोयोटा प्रॅडो गाडी ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. बेसिक मॉडेलची किंमत 96 लाख 30 हजारांपासून सुरु होते. या गाडीची इंजिन क्षमता 2982 सीसी इतकी आहे. या कारचं मायलेज 11 किलोमीटर प्रतिलीटर आहे. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि 7 सीटर असलेल्या या भारदस्त कारमध्ये 7 एअरबॅग्ज आहेत.

6 / 7
NIA ने सर्वात आधी CCTV मध्ये दिसलेली हीच ती इनोव्हा कार ताब्यात घेतली होती

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें