AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack : मुंबई पोलिसांच्या हातावर हल्लेखोराच्या तुरी, तपासासाठी पोलीस या राज्यात, ओढावली मोठी नामुष्की

Saif Ali Khan Attack Big Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. हल्लेखोराने मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे 35 पथकं नेमून सुद्धा तो मुंबई बाहेर पळण्यात यशस्वी ठरल्याचे समोर येत आहे.

Saif Ali Khan Attack : मुंबई पोलिसांच्या हातावर हल्लेखोराच्या तुरी, तपासासाठी पोलीस या राज्यात, ओढावली मोठी नामुष्की
सैफ अली खान, आरोपी निसटला
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 10:09 AM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हल्लेखोराने मुंबई पोलिसंच्या हातावर तुरी दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे 35 पथकं नेमून सुद्धा तो मुंबई बाहेर पळण्यात यशस्वी ठरल्याचे समोर येत आहे. विरोधक या प्रकरणात धार्मिक अँगल असल्याचा दावा करत आहेत. यामुळे आता याप्रकरणाला गंभीर वळण मिळाल्याचे दिसून येत आहे.

दादरमध्ये खरेदी केला हेडफोन

सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचे दिसून आले आहे. त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने या दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केला. तो या दुकानात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला. सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आला. तरीही दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याने तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

हल्लेखोराचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

सैफ अली खान याच्या वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीतील 12 व्या मजल्यातील सदनिकेत हा हल्लेखोर लपला होता. रात्री दोन ते अडीच दरम्यान तो त्याच्या मुलाच्या बेडरूममधून बाहेर आला. त्याने पैशांची मागणी करत वाद घातला. त्यानंतर सैफ अलीवर 6 वार केले. त्यातील दोन वार घातक ठरले. सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. दोन दिवसांपासून मुंबई पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाची पथकं त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी त्याच्यासारखे दिसणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतले होते. पण आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचे समोर येत आहे.

आरोपी पळाला गुजरातकडे

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने वांद्रे ते विरारपर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. आरोपी गुजरातच्या दिशेने निघाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक आता महाराष्ट्राबाहेर आरोपींचा शोध घेत असून, पोलिसांचे एक पथक गुजरातलाही गेले आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.