Arayan Khan Case : “मी नकारात्मक गोष्टी बघत नाही, सकारात्मकतेने काम करत राहातो”, नोकरीवर टांगती तलवार, समीर वानखेडेंचं सूचक ट्विट

Arayan Khan Case : समीर वानखेडे यांनी एक सूचक ट्विट केलंय. यात त्यांनी आपण नकारात्मकडे लक्ष देत नसून सकारात्मकतेने काम करत असल्याचं म्हटलंय.

Arayan Khan Case : मी नकारात्मक गोष्टी बघत नाही, सकारात्मकतेने काम करत राहातो, नोकरीवर टांगती तलवार, समीर वानखेडेंचं सूचक ट्विट
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:04 AM

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) शुक्रवारी ड्रग्जप्रकरणी क्लीनचीट मिळाली. त्यानंतर आता एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.केंद्र सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यांच्या नोकरीवरही गदा येऊ शकते अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी एक सूचक ट्विट केलंय. यात त्यांनी आपण नकारात्मकडे लक्ष देत नसून सकारात्मकतेने काम करत असल्याचं म्हटलंय.

समीर वानखेडे यांचं ट्विट

समीर वानखेडे यांनी एक सूचक ट्विट केलंय. “मी कधीही नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देत नाही. कारण जर तुम्ही या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत बसलात तर तुमची प्रगती होणार नाही. मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सकारात्मक बाजू पाहातो. ज्यामुळे मी कायम पॉझिटिव्ह राहातो. #समीरवानखेडे”, असं ट्विट समीर वानखेडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

वानखेडेंची नोकरी जाणार?

आर्यन खान ड्रग्जप्रकरणात तपास अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची आता नोकरी जाणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, तूर्तास त्यांना पदावरुन हटवण्याची येण्याची शक्यता असल्याचं, केंद्र सराकरमधील सूत्रांनी म्हटलंय. त्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल. या चौकशीत जर वानखेडे यांनी सहकार्य केलं नाही आणि समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. इतकंच काय तर चौकशी समिती त्यांची पगारवाढ रोखण्यासोबत त्याना बडतर्फ करण्याची मागणी देखील करु शकते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.