AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आका’ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा

Sanjay Raut attack on CM Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

'आका'ला सोडून इतरांना मोका, भाजपाची हीच राज्य करण्याची तऱ्हा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा
संजय राऊतांचा घणाघात
| Updated on: Jan 12, 2025 | 11:02 AM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तपासावर बोट ठेवत, सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या धोरणावर आसूड ओढले.

‘आका’वर मोका नाही

वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आता सात आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. त्यात वाल्मीक कराडचे नाव नाही. यासंबंधी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला असा घणाघात राऊतांनी केला.

हीच तर भाजपाची कामाची तऱ्हा

मुख्य आरोपीला सोडून इतरांना मोका लावण्यात आला आहे, असे सांगत त्यांनी भाजपाला चांगलेच सुनावले. हीच भाजपाची राज्य करण्याची पद्धत असल्याचे ते म्हणाले. मुख्य आका तसाच कायम ठेवायचा आणि त्याच्या खालची जी माणसं आहेत. त्यांच्यावर कारवाई करायची. बीड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात जे घडलं आहे. ते अत्यंत धक्कादायक आहे. आपण सामनामध्ये याविषयी भाष्य केल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री वारंवार न्याय आणि सत्य याची भाषा करतात. कोणाला सोडणार नाही, खपवून घेणार नाही, असं सांगतात. पण त्यांनी खपवून घेतलेले अनेक नेते आणि लोकं त्यांच्या बाजूलाच बसल्याचा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला.

वाल्मीक कराड काही दिवसात बाहेर येईल

पण मुख्यमंत्र्यांनी वाल्मीक कराड याला खपवून घेतले आहे, असा चिमटा राऊतांनी काढला. जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत. जो मोठा मासा जाळ्यात अडकून ठेवला आहे. तो वाल्मीक कराड येत्या काही दिवसात बाहेर येईल. त्याच्यावर साधा खंडणीचा गुन्हा दाखल आहे. इतर कोणता गुन्हा आहे? असा सवाल करत त्यांनी कोण कोणाला वाचवत आहे, ते दिसत असल्याचे सांगितले.

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण