
Sanjay Raut on Sunetra Pawar: अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याच्या संशयावरून वातावरण तापले आहे. तर डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. त्यांना दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काल मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने वातावरण तापले होते. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी याविषयावर सरकारवर टीकेची झोड उठवली. त्याचवेळी अजितदादा प्रकरणात तुम्ही एफआयआर का दाखल करत नाही, असं सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, असे वक्तव्य केले.
प्रकरण दाबले जात आहे का?
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तर हे प्रकरण दाबलं जात आहे. तुम्ही काही लपवत आहे.अनेक राजकारणाचे पैसे या VSR Compnay मध्ये गुंतवले आहे . आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये तक्रार दाखल करत आहे. कोणाच्या नशिबात असा अपघात येऊ नाही. सुनित्रा ताई ना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं म्हणून काय फाईल बंद होते का असा सवाल करत त्यांनी कोणाला पाठीशी घालू नका असे राऊत म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी विचारावा जाब
Director general of civil aviation हे भ्रष्ट खात आहे . आणि कोणीही त्यांचं काही करू शकलं नाही. त्यांना अनेक राजकारणाचे आशिर्वाद ही त्यांना आहे.VSR आणि DGCA वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुनेत्रा ताई यांना ही आधिकारा आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांना विचारले पाहिजे की तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही आहेत. आम्ही सर्व पक्षाचे हा विषय लावून धरू.गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे तुम्हाला कोणाची परवानगी लागते काय असा सवाल राऊतांनी विचारला. आतापर्यंत अनेक अपघातात चौकशी CBI ने केले त्याच झालं काय? किती तपास डीजीसीएनने पूर्ण केले हे सांगा. ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे आणि DGCA खोटे बोलत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
अजितदादांना भाजपमधून बाहेर पडायचे होते
सुनेत्रा ताई यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एकत्र येण्याची प्रक्रिया आता संपली आहे आणि जर अजित दादा एकत्र आले असते तर अजित दादा भाजपातून बाहेर आले असते ही माजी माहिती आहे. अजित दादा यांना भाजपमधून बाहेर पडायचे होते. भाजपने दादांना ही फसवले आहे. रोहित पवार आणि कुटुंब मागणी करत आहे चौकशी झाली पाहिजे असे राऊत म्हणाले.
राज्यसभेचा निर्णय बैठकीत
तीन पक्ष राज्यसभेचा विषयावर एकत्र बसतील .आम्ही एकत्र चर्चा करणार आहोत. शरद पवार निवडणूक लढणार आहेत. मी त्यांच्याशी बोललो.महाविकास आघाडी एकत्र निर्णय घेऊ. ४ लोक निवृत्त झाले आहेत आणि सगळे लोक दावा सांगत आहे. पण तीन पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेतील अशी माहिती राऊतांनी दिली.