AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राठोडांच्या पाठिशी नव्हते, मात्र देशमुखांना भक्कम साथ, संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?”

संजय राऊत यांचे वक्तव्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ता केलंय की काय, अशी शंका वाटते. | Pravin Darekar Sanjay Raut

राठोडांच्या पाठिशी नव्हते, मात्र देशमुखांना भक्कम साथ, संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?
संजय राऊत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाहीत.
| Updated on: Mar 25, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई: शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) कधीही पुढे आले नाहीत. मात्र, आता ते अनिल देशमुख यांचे भक्कम समर्थन करुन राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी इमाने-इतबाहेर करत आहेत. त्यामुळे संजय राऊत नक्की शिवसेना की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असा खोचक सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला. (BJP leader Pravin Darekar take a dig at Sanjay Raut)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची गरज नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला. संजय राऊत यांचे वक्तव्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ता केलंय की काय, अशी शंका वाटते. संजय राठोड यांचे कृत्य चुकीचेच होते. पण त्यावेळी संजय राऊत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यावेळी चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा आवश्यक वाटला. तेव्हा चौकशीसाठी राजीनामा आवश्यक नाही, असे राऊत यांना सांगावेसे वाटले नाही. त्यावेळी राऊतांनी संजय राठोड यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, हे माहिती नाही. मात्र, आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पाठराखण इमाने-इतबारे करताना दिसत आहेत, अशी टिप्पणी प्रवीण दरेकर यांनी केली.

‘संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का’

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही. तेव्हा संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयावर बोलू नये, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे.

अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत

Thackery Govt meeting: ‘ आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे’

महाविकासआघाडीच्या गोटात वेगवान हालचाली; सुप्रिया सुळेंची सोनियांशी चर्चा, मुंबईतही नेत्यांची गुप्त खलबतं

(BJP leader Pravin Darekar take a dig at Sanjay Raut)

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.