AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील

सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती दिली असली तरी लढाई संपली नाही, असं सतेज पाटील म्हणाले. (Satej Patil Farmer Protest)

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
| Updated on: Jan 12, 2021 | 8:16 PM
Share

मुंबई: सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, लढाई अजून संपलेली नाही, असं ट्विट काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. कृषी कायद्यांच्या बाजूनं लिहिणाऱ्यां बोलणाऱ्यांच्या समितीमधील समावेशाबद्दल सतेज पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. (Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी कायदे रद्द करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सतेज पाटील यांनी ट्विट करत कृषी कायद्यांविरोधातील लढाई संपली नसल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं बनवलेल्या समितीमधील चार सदस्य कृषी कायद्यांच्या बाजूनं बोलणारे किंवा लिहिणारे आहेत.

दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा

तीन कृषी कायद्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या या चार सदस्यांचा समावेश असणारी ही कमिटी आंदोलन थांबविण्यासाठी केलेला फक्त एक फार्स ठरू नये, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. सतेज पाटील यांनी या “कमिटीने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून या निर्दयी मोदी सरकारला हे काळे कायदे रद्द करायला लावावेत.”अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

सतेज पाटील यांचं ट्विट

समितीमध्ये कुणाचा समावेश

सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत भारतीय किसान यूनियनचे नेते भूपिंदर सिंह मान, आंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे डॉ. प्रमोदकुमार जोशी, कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे नेते अशोक घनवट यांचा समावेश आहे. शेतकरी नेते भूपिंदर सिंह मान यांनी उघडपणे आणि घनवट यांनी काही सुधारणा सुचवून या कायद्यांना पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यासाठीच्या समितीत चौघांपैकी दोघे कायद्याचे समर्थक; ‘हा’ मराठमोळा नेताही समितीत

Supreme Court stays Farm laws | जय किसान! मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

(Satej Patil said struggle of farmer protest not end after Supreme Court decision)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.