शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटीबद्ध, राज्यात 500 आदर्श शाळा स्थापित करणार – वर्षा गायकवाड

सरकार शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. 500 आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेनं टाकलेले पाऊल असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय.

शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटीबद्ध, राज्यात 500 आदर्श शाळा स्थापित करणार - वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 4:35 PM

मुंबई : राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. 500 आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेनं टाकलेले पाऊल असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला गेला असला. तर विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय महत्वाचा म्हणावा लागेल.(Varsha Gaikwad’s decision to make 500 government schools ideal in the state)

“शासकीय शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ५०० आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडेल,यासाठी शाळांत नियमित शिक्षणाव्यतिरिक्त मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल असे शिक्षण दिले जाईल”, असं ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

“सदर आदर्श शाळांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, आदर्श शिक्षक-विद्यार्थी संख्येनुसार सोयीसुविधा, ()ICT(Information and Communications Technology) चा वापर, निकाल आणि परिणामांवर भर दिला जाईल”, असंही गायकवाड यांनी म्हटलंय.

शासन निर्णय काय आहे?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या 81 शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करुन प्रथम टप्प्यात सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे 488 शाळा आदर्श म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आदर्श शाळांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असाव्यात?

>> वाढता लोक सहभाग >> भविष्यात वाढती पटसंख्या व किमान 100 – 150 पटसंख्या >> शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) असणे अपेक्षित आहे >> आकर्षक शाळा इमारत >> विद्यार्थीनुसार वर्ग खोल्या >> मुलां-मुलींकरीता आणि CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे >> पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन >> मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष >> शैक्षणिक साहित्य >> खेळाचे साहित्य >> ग्रंथालय/वाचनालय >> संगणक कक्ष >> virtual class room ची सुविधा >> शाळेत विद्युतीकरण सुविधा >> शाळेला संरक्षक भिंत >> आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील fire extinguisher सह energency exit ची उपलब्धता >> परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे >> उत्कृष्ठ शिक्षकांना देशांतर्गत/देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाठवणे >> इयत्ता 5वी Scholership परीक्षेची तयारी करुन घेणे

संबंधित बातम्या :

शाळा सुरु होईपर्यंत फी घेऊ नका, अन्यथा कारवाई : वर्षा गायकवाड

टीईटी परीक्षा कायद्यात दुरुस्ती होणार?, वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

Varsha Gaikwad’s decision to make 500 government schools ideal in the state
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.