पुणे : एकिकडे राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे काही शाळांकडून पालकांकडे शाळा सुरु होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले (Varsha Gaikwad on school fees).