Sharad Pawar : एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम, काय दिला संदेश?

Sharad Pawar Power Game: तर राज्यात नवीन आख्यान सुरू झालं आहे. या आख्यानाचा पडदा जरी अजितादादांच्या राष्ट्रवादीने उघडला असला तरी आत दोरी कुणाच्या हाती आहे, याची चर्चा घडवून आणण्यात अखेर शरद पवार हे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच साहेबांनी एकाच दगडात अनेक पक्षी गार केल्याचा संदेश राज्यात अलगद पोहचला आहे. थोरल्या साहेबांची हीच खासियत मानली जाते.

Sharad Pawar : एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा पॉवरगेम, काय दिला संदेश?
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 31, 2026 | 5:15 PM

Sharad Pawar Power Game: राष्ट्रवादीतील नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला. दुखावट्याटात काही भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात. पण त्यात मुरब्बीपणा, कसलेला नेताच दाखवू शकतो. नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपथ्य कोणी केलं, साग्रसंगीत कोण देतंय आणि पटकथा कुठं बसून लिहिल्या गेली हे समोर यायलं वेळ लागत नाही. शरद पवार यांच्या हाती सध्या राजकीय घड्याळ नसलं तरी कोणती चाबी फिरवली की घड्याळातील काटे भराभर फिरतात हे त्यांना माहिती आहे. आज सकाळीच शरद पवार यांनी ही चाबी फिरली आणि घड्याळीतील सर्वच काटे सैरभैर झाले. आजच्या राष्ट्रवादीच्या शपथविधीच्या अंकाचा पडदा जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडला असला तरी दोरी कुणाच्या हाती आहे, हे समोर आणण्यात शरद पवार हे यशस्वी झाले. थोरल्या साहेबांनी एकाच बार मध्ये टोळधाड आणि कणसावरील पक्षी आकाशात भिरकावल्याचे जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली. एकाच दगडात अनेक पक्षी गार करण्याची हतोटी थोरल्या साहेबांकडं पूर्वीच असल्याची चर्चा राजकीय चाणक्यांमध्ये रंगली आहे.

सकाळच्या पत्रकार परिषदेतून अनेक संदेश

शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. माध्यमांची नस शरद पवारांनाही माहिती आहे. त्यांनी प्रश्न येताच फटकारे मारले. त्याचे परिणाम पुढील तासात राज्यात दिसले. धावपळ, गदारोळ आणि या सर्वच घडामोडींमागे कोण सूत्रधार आहे, याचे समतोल गणित शरद पवार यांनी मांडले. शरद पवार यांनी पडद्याआड घडलेल्या गोष्टींची वाचत्या न करता राजकारणातील हा वेगळा टर्न लागोलाग राज्यासमोर आणला. सकाळच्या त्यांच्या मुलाखतीने अचूक टायमिंग साधलं आणि परिपाक ,परिणामासह साधला. समाजमनात थेट संदेश गेला. राजकीय पटलावर संध्याकाळी घडामोडी घडल्या. पण जो संदेश दिल्या गेला. त्याचे दूरगामी परिणाम होतील हे सकाळच्या मुलाखतीने साध्य झालं.

शरद पवारांचा पॉवर गेम

शरद पवार यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत एकाच बाणात शंभर गार असा पॅटर्न राबवला. एकाच दगडात अनेक पक्षी टिपले. आज सुनेत्रा पवार या शपथ घेणार हे आपल्या गावी नसल्याचे सांगत त्यांनी खळबळ उडवली. तर या शपथविधीच्या प्रकरणात राजकीय पक्ष म्हणूनच नाही तर कुटुंब म्हणूनही आपला दुरान्वये संबंध नाही हा संदेश देण्यात पवार यशस्वी ठरले.

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतं त्यांनी पडद्यामागील सूत्रधाराचं नाव बाहेर आणलं नाही. पण वर्षावरील बैठकीनं लोकांचा अंदाज पक्का झाला. तर इतक्या घाईत शपथविधी का घेण्यात येत आहे यावर भाष्य न करता हा मुद्दा मात्र त्यांनी समोर आणला. त्यावरून दिवसभरात चर्चांना पेव फुटले.

तर राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणातही आपण सहभागी नव्हतो असे त्यांनी रेखाटले. दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक होते. त्यांच्या सुसंवाद तयार झाला होता. अजित पवार हे विलीनि‍करणासाठी आग्रही होते. जयंत पाटील यांच्यासोबत दादांची बैठक झाली. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती हा गौप्यस्फोट पवारांनी केला. तर त्याचवेळी सध्याचे राष्ट्रवादीतील नेते नेमकं त्याच्या उलट वागत असल्याचा मोठा संदेश यातून द्यायला ते विसरले नाहीत.

तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप हे सर्व घडवून आणत आहे का? यावर कुठलंही भाष्य न करता वा त्याविषयी एक चकार शब्द ही न बोलता तशा चर्चा मात्र आपोआप घडल्या. शरद पवार यांनी या सर्वांमधून मोठा संदेश दिला आहे. तर राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत आता खंड पडल्याचे सांगत त्यांनी थेट संदेश दिला आहे.