सचिन वाझेंवरुन सत्ताधारी बॅकफूटवर, मदतीसाठी थेट शरद पवारांना कॉल, पवारांचा महत्त्वाचा सल्ला

सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. | Sharad Pawar

सचिन वाझेंवरुन सत्ताधारी बॅकफूटवर, मदतीसाठी थेट शरद पवारांना कॉल, पवारांचा महत्त्वाचा सल्ला
सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते.

मुंबई: हिरेन मनसुख प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आरोपांची राळ उडवून दिल्यामुळे महाविकासआघाडी बॅकफूटवर गेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेले पुरावे आणि विषयाच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना मंगळवारी सभागृहात नेमकं काय उत्तर द्यायचं हेच कळेनासे झाले होते. या पार्श्वभूमवीर आता महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार आणि संकटमोचक शरद पवार मदतीसाठी धावून आले आहेत. (Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case)

सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधाऱ्यांची रणनीती नेमकी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात बजेट मंजूर करून घेणे, हाच एकमेव अजेंडा ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.

सचिन वाझेंनी दोन गोष्टी लपवल्या, एक- गुन्ह्यातील गाडी तेच वापरत होते, दुसरी… : देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ते गावडे हे २०१७ च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केलं होतं. या दोघांना बेल मिळाली आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, सरळसरळ अर्थ असा आहे, त्यांची हत्या झाली आहे. एव्हढे पुरावे असताना, आमची मागणी एकच होती, सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे प्रमुख आहे. त्यांना पुरावे नष्ट करण्याचे रिसोर्सेस आहेत. त्यामुळे त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गाडी क्राईममध्ये वापरली आहे ती गाडी चार महिने त्यांच्याकडे सचिन वाझेंकडे होती हे त्यांनी लपवलं आणि मनसुख हिरेनला ओळखत होते हे लपवले, त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील, मात्र आयपीसी 201 अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी होती.

पण आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, तेव्हा गृहमंत्र्यांनी कबुल केलं त्याला हटवण्याचं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याबाबत बदलले. सचिन वाझेला पदावरुन दूर करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे सरकार पाठिशी घालत आहे. याचं कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठिमागे कोण कोण आहे, सचिन वाझे कोणा कोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार पाठिशी घालत आहे. यामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत. हे सरकार पूर्णपणे उघडं पडलं आहे.

संबंधित बातम्या 

Mansukh Hiren death : भर सभागृहात चिरफाड, देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शब्द, जसाच्या तसा!

Mansukh Hiren Death Case : मनसुख हिरेन, मोहन डेलकर, सचिन वाझे ते फडणवीसांना धमकी? विधानसभेत नेमकं काय घडलं?

(Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case)

Published On - 11:05 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI