AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ईडी’च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी झाली: प्रताप सरनाईक

माझ्या चौकशीवेळी प्रश्न आणि उत्तरांचा सिलसिला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. | Pratap Sarnaik

'ईडी'च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी झाली: प्रताप सरनाईक
pratap sarnaik,
| Updated on: Dec 14, 2020 | 2:11 PM
Share

मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘ईडी’कडून करण्यात आलेल्या चौकशीसंदर्भात भाष्य केले. ‘ईडी’कडून माझी सलग पाच तास चौकशी करण्यात आली. मात्र, ही सर्व चौकशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे सरनाईक यांनी सांगितले. (Shiv Sena MLA Pratap Sarnaik on ED probe)

आता पुन्हा मला ‘ईडी’च्या चौकशीसाठी जावे लागणार नाही. जर काही प्रश्न असलेच तर मी बोलावल्यानंतर दोन तासांत हजर होईल, असे मी ‘ईडी’ला सांगितले. माझ्या कुटुंबीयांपैकीही कोणालाही आता चौकशीला बोलावण्याची आवश्यकता नाही. माझ्या चौकशीवेळी प्रश्न आणि उत्तरांचा सिलसिला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. तसेच या घोटाळ्यातील दोषींना कडक शासन झाले पाहिजे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

‘कंगना रानौतमुळे माझी बदनामी, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे’

माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे ट्विट कंगना रानौत हिने केले होते. त्यामुळे देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली. माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला.

याबाबत मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी विनंती मी सभागृहाला केली आहे. खोटे ट्विट करणाऱ्या कंगनाला शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणीही महाराष्ट्राची बदनामी करणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

काय आहे नेमका घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती.

संबंधित बातम्या:

जे सत्य आहे ते मी सांगितलंय, माझा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही : प्रताप सरनाईक

केंद्र-राज्य संघर्षात मी तानाजी मालुसरे झालो : प्रताप सरनाईक

Special Report | प्रताप सरनाईकांच्या चौकशीतून ईडीच्या हाती काय लागणार?

(Shiv Sena MLA Pratap Sarnaik on ED probe)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.