AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: संजय राऊत शिक्षा, याचिकाकर्त्या मेधा सोमैया यांची पहिली प्रतिक्रिया… बेताल वक्तव्य….

Sanjay Raut convicted in defamation case: राऊत यांनी 2022 मध्ये त्यांच्यावर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला. खोटी बिले देऊन पैसे उकळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारण दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती.

Sanjay Raut: संजय राऊत शिक्षा, याचिकाकर्त्या मेधा सोमैया यांची पहिली प्रतिक्रिया... बेताल वक्तव्य....
Medha Kirit Somaiya and sanja raut
| Updated on: Sep 26, 2024 | 1:00 PM
Share
Sanjay Raut convicted in defamation case:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने एका अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहे. त्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ही शिक्षा संजय राऊत यांना झाली आहे. न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर मेधा सोमय्या यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास होताच. हा विश्वास आता अधिकच दृढ झाला आहे, असे मेधा सोमय्या यांनी म्हटले आहे.

मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मेधा सोमय्या यांनी म्हटले की, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हा विश्वास आणखी दृढ झाला आहे. कोणी माझ्या परिवार किंवा माझ्या संस्थेवर बेताल वक्तव्य करत असतील तर अजिबात सहन करणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, त्यांना जमीन मिळाला तर काय करावे, हे पुढच्या पुढे पाहू या. आता आधी कोर्टाची ऑर्डर मिळू द्या. त्यानंतर पुढे काय करावे त्याचा निर्णय घेता येईल.

न्यायालयाच्या निकालास कालावधी लागला आहे का? त्यावर बोलताना मेधा सोमय्या म्हणाल्या, निकालाबाबत मी समाधानी आहे. तसेच या प्रकरणी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. मेधा सोमय्या या माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये रसायनशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

काय आहे प्रकरण?

मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालवतात. राऊत यांनी 2022 मध्ये त्यांच्यावर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला. खोटी बिले देऊन पैसे उकळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारण दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. संजय राऊत या आरोपींच्या पृष्टीसाठी काहीच पुरावे देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.