AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद: संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का | Sanjay Raut

शिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद: संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Updated on: May 27, 2021 | 10:03 AM
Share

मुंबई: महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना नाराज आहे, ही निव्वळ अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut denied Shivsena unhappy in Mahavikas Aghadi govt)

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराज असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच शरद पवार यांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल, असा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी या सगळ्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे ध्यानात आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही

राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पहिली ठिणगी, उद्धव ठाकरेंची थेट शरद पवारांकडे नाराजी

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, अर्धा तास खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात

(Shivsena MP Sanjay Raut denied Shivsena unhappy in Mahavikas Aghadi govt)

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.