AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा

Uddhav Thackeray on IPL :देशात आयपीएलचा ज्वर चढला आहे. आयपीएलच्या सामन्यांची सगळीकडे चर्चा असतानाच नेमका हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी राजकारण्यांना चिमटा काढला आहे. त्यांच्या या फटकेबाजीची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray: 'जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी'; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा
उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 21, 2026 | 9:24 AM
Share

Uddhav Thackeray on Indian Political League: देशात आयपीएलचा ज्वर अनेकांना चढला आहे. आयपीएलचे सामने चाहते डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. आपला संघ हरल्यावर ते लागलीच दुसर्‍या संघाला प्रोत्साहन देत आहेत. तर गेल्या आयपीएलमध्ये एका संघाकडून खेळलेला खेळाडू यावेळी दुसर्‍या संघात खेळताना दिसत आहे. नेमका हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयाराम-गयारामांना जमके टोला लगावला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. IPL चा उल्लेख करत त्यांनी कुणाला तो चिमटा लावला आणि कुणाला टोला लगावला याची चर्चा रंगली आहे.

‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’

आता IPL सारखी राजकारणातही बोली लावली जाते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळेल हे कळत नाही. मागेही मी एकदा बोललो होतो की अनेकदा आपण टीव्हीवरती सामना बघत असताना आपण म्हणतो की हा आपला खेळाडू आहे, आता तो त्या संघाकडून खेळतोय. कारण तिकडे सुद्धा बोली लागते आणि आता राजकारणात सुद्धा बोली लागायला लागली आहे. ज्याची बोली अधिक तिकडे खेळाडू जातात, असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला.

विक्रोळी, भांडूपमधील लोकांनी आपला भगवा आणि मराठी बाणा कायम ठेवला याचा मला आनंद आहे, असे ठाकरे म्हणाले. बंगालमध्ये सगळे बंगाली एकवटलेत, तामिळनाडूत तामिळी एकवटलेत तसेच महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणूस एकवटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी कविता, शेर सादर करत भाषण गाजवले होते. त्यांनी सध्याच्या राजकारणाची तुलना ही आयपीएलशी केली. इंडियन पॉलिटिकल लीग सुरू झाली आहे का असा चिमटा त्यांनी काढला होता. शिवसेना फुटीनंतर आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली.  उद्धव ठाकरे यांचा कालच्या सभेतील चिमटा कुणाला होता हे वेगळं सांगायची गरज नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...