मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ; मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मच्छिमार, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ; मंत्री अस्लम शेख यांची माहिती
Aslam Shaikh

मुंबई : कोरोना (Coronavirus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयाची चालू वर्षाची ठेका तलाव रक्कम भरण्यास तसेच मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे आणि मत्स्य बीज केंद्राची रक्कम भरणे आदीसह विविध उपक्रमांचा शासकीय भरणा करण्यास सहा महिने मुदतवाढ दिली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी दिली आहे. (Six-month extension to pay contract to fishermen; Says Aslam Sheikh)

कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनूसार मासेमारी करता आलेली नाही. तसेच उत्पादीत मासळीची विक्री करण्यासदेखील पुरेसा वाव मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.

राज्यातील मच्छिमारांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयांची चालू वर्ष 2021-22 ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यास आणि इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरणा करण्यासाठी ठेका रक्कम भरणा करण्याची अंतिम दिनांक 31 मे 2021 पासुन पुढे सहा महिने (दि. 30 नोव्हेंबर, 2021) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

दरम्यान, भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्टीची रक्कम भरणा करण्यास ठेका रक्कम भरणा करण्याच्या अंतिम दिनांकापासुन पुढे सहा महिने मुदतवाढ देण्यात येत आहे. पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धनासाठी 1% आणि 0.5% क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्राची ठेका रक्कम भरणा करण्यास ठेका रक्कम भरणा करण्याच्या अंतिम तारखेपासून पुढे सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

मच्छिमारांना दिलासा

मंत्री अस्लम शेख म्हणाले की, संकटकाळात राज्य शासन नेहमीच मच्छिमार बांधवांच्या पाठीशी उभं आहे. या निर्णयामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राज्यातील मत्स्यव्यवसायिक, मत्स्यव्यवसाय संस्था तसेच मच्छिमारांना दिलासा मिळणार आहे.

इतर बातम्या

लोखंडवाला तलावाचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवा; पाहणीनंतर महापौरांचे आदेश

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिकेची लस मिळवण्यासाठी धडपड, थेट जगातील 6 शहरांच्या महापौरांना पत्र

(Six-month extension to pay contract to fishermen; Says Aslam Sheikh)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI