Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत सहा ठराव मंजूर पण महत्वाचा कोणता? भास्कर जाधवांनी सविस्तर सांगितलं

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जो महत्वाचा ठराव झाला तो म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीतील खासदारापर्यंत आणि खासदारापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पक्षाला मिळालेले जे यश आहे ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे आणि त्यांच्या बुद्धीचातुर्यामुळे पक्षाला यश मिळाले असल्याचेही सांगण्यात आले.

Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत सहा ठराव मंजूर पण महत्वाचा कोणता? भास्कर जाधवांनी सविस्तर सांगितलं
महादेव कांबळे

|

Jun 25, 2022 | 4:44 PM

मुंबईः बंडखोर आमदारांमुळे (Rebel MLA) राज्यातील सरकार अडचणीत आले असतानाच शिवसेनेची (Shivsena) आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (national executive meeting) आज पार पडली. या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कायदेशीर, शासकीय आणि एकमताने ठराव पारित करण्यात आले. या बैठीकीत एकूण सहा ठराव पारित करण्यात आले. या बैठकीत आजपर्यंत जे शिवसेनेला यश मिळाले आहे, शिवसेनेमुळे जो करिश्मा झाला आहे तो करिश्मा हा उद्धव ठाकरे यांच्यामुळे झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचेही भास्कर जाधव यांनी सांगितले.

शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज सहा ठराव मंजूर करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या सर्व निवडणुका लढणार असल्याचे सांगून सर्व सदस्यांनी मिळून काही कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा गौरव

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा गौरवाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यातील दोन ठराव अत्यंत महत्वाचे आहेत. पाचवा ठरवा करण्यात आला की, शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि ती तशीच राहिल.

बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाही

बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा झाली नाही आणि होणार नाही. मराठी अस्मितेचा हा विचार आहे. तर ज्या आमदारांनी गद्दारी केली आहे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी हा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात आले.

बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरता येणार नाही

सहाव्या ठरावात आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुठल्याही संघटनेला वापरता येणार नाही. अशा प्रकारे कुठलाही गद्दार त्यांच्या नावाचा वापर करू शकत नाही. तर तुम्हाला मतं मागायची असतील तर ती तुमच्या बापाच्या नावाने मागा. दुसऱ्याच्या बापाच्या नावाने मागू नका असंही यावेळी सांगण्यात आले. तर बंडखोर आमदारांवर कारावाईबाबत तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळणार असल्याचेही बैठकीनंतर सांगण्यात आले. मंत्रिपदावर कोण राहणार आहे याविषयीही निर्णय घेण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे पक्षाला यश

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महत्वाच्या गोष्टींविषयी चर्चा झाली असून या बैठकीत राजकीय, संघटनात्मक, पक्षाची उठावदार कामगिरी याविषयीही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जो महत्वाचा ठराव झाला तो म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीतील खासदारापर्यंत आणि खासदारापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पक्षाला मिळालेले जे यश आहे ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे आणि त्यांच्या बुद्धीचातुर्यामुळे पक्षाला यश मिळाले असल्याचेही सांगण्यात आले.

कोण मंत्री राहणार कोण जाणार

आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली असली तरी आता पुन्हा युवा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीत महत्वाचेही निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या होणाऱ्या या बैठकीनंतर सायंकाळी शिवेसेनेचे मंत्री कोण राहील आणि कोण जाईल हा महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, या बैठकीनंतर कोणाचेही मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजीही घेतली जाणार असल्याचे सागंण्यात आले आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें