AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरात काँग्रेसची नवी रणनिती; सुशीलकुमार शिंदे यांचा विशेष प्लॅन

Congress Leader Sushilkumar Shinde in Acitve Mode For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशाच काँग्रेसने नवी रणनिती आखली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरात काँग्रेसची नवी रणनिती; सुशीलकुमार शिंदे यांचा विशेष प्लॅन
| Updated on: Jan 17, 2024 | 11:44 AM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 17 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.लोकांना आपल्या बाजूने करण्यासाठी काँग्रेसनेही ग्राऊंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापुरात काँग्रेसने स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी विशेष प्लॅन केल्याचं दिसतं आहे. आज सकाळीच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात फेरफटका मारला आणि स्थानिकांशी संवाद साधला.

सोलापुरात शिंदेंची ‘चाय पे चर्चा’

सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावर ‘चाय पे चर्चा’ केली. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक व्यापारी तसेच एसटी आणि खाजगी नोकरदारांसोबत ‘चाय पे चर्चा’ त्यांनी केली सुशीलकुमार शिंदे हे वीस दिवसांपासून सोलापुरात ठाण मांडून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळतायेत. यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी चहाचा आस्वाद घेत बिस्कीटावर ताव मारला. यावेळी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर त्यांनी चर्चा केली.

आव्हाडांच्या विधानावर शिंदे म्हणाले…

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जितेंद्र आव्हाड यांचं मत असेल. मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली. त्यामध्ये त्यांना माहिती होते की ज्युडीसिअरीमध्ये आरक्षण द्यावे की नाही द्यावं.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन करून ते केलेलं आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र जी घडलेली घटना आहे त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन करून ते केलेलं आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं आहे. मोदींचं स्वागत करण्यासाठी जाण्याचा प्रश्न येत नाही. मोदीजी येत असलेला कार्यक्रम हा विशिष्ट कार्यकर्त्यांचा आहे. मात्र उगाच खाजवून खरूज काढण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी ते टाळतो, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.