BREAKING | मुंबई महापालिकेविरोधात सोनू सूदची हायकोर्टात धाव, अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा

याप्रकरणी सोनू सूद याने कोर्टात धाव घेतली असून उद्या या प्रकरणी सुनावणी केली जाणार आहे. (Sonu Sood Moves Bombay High Court against BMC notice)

BREAKING | मुंबई महापालिकेविरोधात सोनू सूदची हायकोर्टात धाव, अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 5:53 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप घेत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सोनू सूद याने मुंबईच्या हायकोर्टात धाव घेतली आहे. उद्या या प्रकरणी सुनावणी केली जाणार आहे. (Sonu Sood Moves Bombay High Court against BMC notice for illegal construction)

अभिनेता सोनू सूद याने शक्ती सागर या इमारतीत कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची उद्या (11 जानेवारी) सुनावणी केली जाणार आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार दाखल

अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेनं जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीनं ही तक्रार दाखल केली. मुंबई महापालिकेनं जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 4 जानेवारी 2020 ली ही तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदनं केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आलं होतं.

सोनू सूद यांची भूमिका

याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

बीएमसीच्या तक्रारीत काय?

बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे.त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे. अधिकाऱ्यांच्यामते, बीएमसीने जारी केलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने मुंबईच्या सिव्हिल न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्यांना अंतरिम दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सोनू सूदला उच्च न्यायालायत याचिका करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला होता. बीएमसीच्या मते न्यायालयाने दिलेला तीन आठवड्यांचा कालावधी संपला आहे. (Sonu Sood Moves Bombay High Court against BMC notice for illegal construction)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार

Special Story : सोनू सूदला अनधिकृत बांधकाम भोवणार?; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरणं?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.