स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावर नायर रुग्णालयात होणार उपचार, डायरेक्ट रिलीफ या संस्थेच्या मदतीने औषधोपचार उपलब्ध होणार

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसित होत नाहीत. परिणामी, या आजाराने ग्रस्त संबंधीत मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो.

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावर नायर रुग्णालयात होणार उपचार, डायरेक्ट रिलीफ या संस्थेच्या मदतीने औषधोपचार उपलब्ध होणार
स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावर नायर रुग्णालयात होणार उपचार
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 5:15 PM

मुंबई : सोळा कोटींचे इंजेक्शन घेऊनही निधन झालेल्या वेदीका शिंदेला झालेल्या आजारावर आता मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार होणार आहेत. लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळीच, आजपासून नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा सुरु केल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. (Spinal muscular atrophy will be treated at Nair Hospital)

महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार

स्पायनल म्स्क्युलर ॲट्रोफी सारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील 17 रुग्णांना त्याचा लाभ होईल.

जाणून घ्या स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाविषयी

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसित होत नाहीत. परिणामी, या आजाराने ग्रस्त संबंधीत मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. या आजारावरील औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ या बिगर शासकीय संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सदर आजाराने ग्रस्त 17 रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. या 17 रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे. स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे 87 लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे 6 कोटी तर, त्यापुढील प्रत्येक वर्षी 3 कोटी 20 लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो. ही आत्यंतिक महागडी उपचार पद्धती सदर निवडलेल्या 17 रुग्णांना पुरविण्यासाठी “डायरेक्ट रिलिफ” ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहे. (Spinal muscular atrophy will be treated at Nair Hospital)

इतर बातम्या

शुल्क माफीच्या मागणीसाठी थेट शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अटक

पूरग्रस्तांच्या मदतीच्या पॅकेजमध्ये वाढ करा, आमदार महादेव जानकरांची मागणी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.