SSC, HSC Exam | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

आकडेवारीनुसार, मार्च 2020 नंतर देशात एकूण 1742 मुले अनाथ झाली आहेत. NCPCR च्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 7464 मुलांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या पालकांपैकी एकाला गमावले आहे. या कालावधीत एकूण 140 मुलांना असेच सोडून देण्यात आले होते.

SSC, HSC Exam | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : देशभरात 2020 मध्ये कोरोनाने हाहाःकार माजवला होता. लाखो लोक कोरोना बाधित झाले. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अनेक मुलं कोरोनामुळे अनाथ झाली. या अनाथ झालेल्या मुलांबाबत राज्य शासनाने एख महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

शैक्षणिक प्रगतीत अडथळा येऊ नये म्हणून शुल्क माफ

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यास्तव महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

गतवर्षीच्या अहवालानुसार कोरोनामुळे 1742 मुले अनाथ

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून (NCPCR) गतवर्षी सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर करण्या आली होती. आकडेवारीनुसार, मार्च 2020 नंतर देशात एकूण 1742 मुले अनाथ झाली आहेत. NCPCR च्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 7464 मुलांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या पालकांपैकी एकाला गमावले आहे. या कालावधीत एकूण 140 मुलांना असेच सोडून देण्यात आले होते. (SSC and HSC examination fees waived for students orphaned in Corona)

इतर बातम्या

Omicron : ओमिक्रॉनचा धोका; महाराष्ट्र सरकारकडून नवी नियमावली जारी, कुठले नियम पाळावे लागणार?

राज्यातील 125 तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत, अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजावणी

Published On - 9:50 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI