मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

आज पहिल्यांदा प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. (State Cabinet Meeting In the presence of CM Uddhav Thackeray) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 6:33 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (20 जानेवारी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण, वाढीव वीजबिलासह इतर महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकासआघाडीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.  (State Cabinet Meeting In the presence of CM Uddhav Thackeray)

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक राज्य मंत्रिमंडळ बैठकींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहत होते. मात्र यानंतर आज पहिल्यांदा प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

  • कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी
  • राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय
  • खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेचे नेते उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीपूर्वी ही बैठक झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली

राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 12 टक्के आरक्षण दिलं होते. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची याचिका आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणीची तारीख 25 जानेवारी देण्यात आली होती. मात्र, आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (State Cabinet Meeting In the presence of CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक

ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.