AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही…,’ रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी अर्ज मागवले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी हे अर्ज मागवले आहे.

'मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही...,' रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल
मुंबई रेल्वे स्टेशन (फाईल फोटो)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 14, 2025 | 9:53 AM
Share

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचत असल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवाही ठप्प होते. त्यामुळे लाखो मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागतो. मुंबईतील रेल्वे मार्गावर पाणी साचू नये, यासाठी आता महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मार्गावरील पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सल्लागारांकडून सुचवण्यात येतील. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

एमआरव्हीसी मास्टर प्लॅन तयार करणार

पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी अर्ज मागवले आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी एमआरव्हीसीने व्यापक पूरनिवारण मास्टर प्लॅन तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एमआरव्हीसी यासंदर्भात पात्र सल्लागार कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. निवड झालेल्या कंपनीकडून वर्षभर अभ्यासानंतर पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. हा प्रकल्प एमयूटीपी- ३अ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) मार्फत आर्थिक मदत मिळणार आहे.

का होतात रेल्वे मार्ग ठप्प

पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅकखालील वाहिन्यांतून समुद्रात जाणे अपेक्षित आहे. मात्र, अपुर्ण ड्रेनेज, गाळ साचणे व अनियोजित शहरीकरणामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रेल्वेमार्ग ठप्प होतात. ही समस्या सुटावी यासाठी एमआरव्हीसीचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. मध्य रेल्वेने नालेसफाई केल्यानंतरही कुर्ला, सायन, मशीद बंदर येथे थोड्याशा पावसातही पाणी साचले होते. मशीद बंदर येथे सकाळच्या वेळी पाणी साचल्याने लोकल सेवेला ब्रेक लागला होता. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?