राज्यात पुन्हा लॉकडाऊन नेमकं कधी लागू शकतं? आरोग्य मंत्र्यांचा पहिल्यांदाच थेट अलर्ट

तिसऱ्या लाटेचा विचार करता 200 मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवणार असून 141 ऑक्सिजन प्लांटना मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 3800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन नेमकं कधी लागू शकतं? आरोग्य मंत्र्यांचा पहिल्यांदाच थेट अलर्ट
ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल त्या दिवशीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 7:34 PM

मुंबई : कोरोनासह विविध मुद्द्यांवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागीकडून निर्बंध कमी करण्याबाबत प्रस्ताव गेला होता. बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तिसऱ्या लाटेचा विचार करता 200 मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवणार असून 141 ऑक्सिजन प्लांटना मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 3800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो, तिसऱ्या लाटेत 700 मेट्रीक टन ऑक्सिजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल, असेही टोपेंनी यावेळी स्पष्ट केले. (Strict lockdown will be enforced in the state from the day 700 metric tonnes of oxygen is required)

कॉलेजबाबत अंतिम निर्णय दोन-चार दिवसात

“मी स्वत: हायर एज्यूकेशनचे डायरेक्टरसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की, प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरु, त्या विद्यापीठाच्या अखत्यारित येणारे जिल्हे, तसेत शिक्षण संस्था यांच्या चर्चा करुन दोन-चार दिवसात आरोग्य विभागात अहवाल दिला जाईल. नंतर कॉलेज संदर्भात निर्णय होईल”, असं त्यांनी सांगितलं.

खासगी कार्यलये 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

रेस्टॉरंट्स सुरु, मात्र अटी शर्थी लागू

रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. “जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Strict lockdown will be enforced in the state from the day 700 metric tonnes of oxygen is required)

संबंधित बातम्या

शाळा-कॉलेज सुरु करण्यावर अवघ्या 24 तासात ब्रेक, आज-उद्या अंतिम निर्णय अपेक्षित, टास्क फोर्सचा विरोध का?

हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.