कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्याची सुरेखा पुणेकरांना खंत

कल्याण : काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अचानक त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राजकीय पक्षाच्या या कृतीविषयी सुरेखा पुणेकर यांनी खंत व्यक्त केली. तमाशा लोक कलावंतांचाही एक प्रतिनिधी लोकसभेत असावा, अशी इच्छा पुणेकर यांनी व्यक्त केली आहे. सुरेखा पुणेकर या एका कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये आल्या होत्या. निवडणुकीदरम्यान […]

कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्याची सुरेखा पुणेकरांना खंत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

कल्याण : काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अचानक त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राजकीय पक्षाच्या या कृतीविषयी सुरेखा पुणेकर यांनी खंत व्यक्त केली. तमाशा लोक कलावंतांचाही एक प्रतिनिधी लोकसभेत असावा, अशी इच्छा पुणेकर यांनी व्यक्त केली आहे.

सुरेखा पुणेकर या एका कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये आल्या होत्या. निवडणुकीदरम्यान झालेल्या त्यांच्या नावाच्या चर्चेविषयी विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांना दिल्लीतून एका पत्रकाराचा फोन आला. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की आपल्या उमेदवारीची काँग्रेस पक्षाकडून चर्चा सुरु आहे. बहुतेक पुण्यातून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल, असं सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची विचारणा पुन्हा झाली नाही. तसेच कोणी फोनही केला नाही.

आत्ता माझा विचार केला नसल्याने अन्य कोणत्याही पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेल्यास मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तमाशा आणि लोक कलावंतांच्या खूप व्यथा आहेत. त्यांच्या जीवन-मरणाचे प्रश्न आहेत. मी एक तमाशा आणि लावणी कलावंत या नात्याने मला त्याची जाण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी तपाशा आणि लावणीचे कार्यक्रम केले. एक लोक कलावंत म्हणून राज्य, देश आणि विदेशात कार्यक्रम केले. त्यामुळे माझी ओळख नव्याने कोणत्याही मतदारसंघात सांगण्याची गरज कोणत्याही पक्षाला भासणार नाही. मतदार असे सांगू शकत नाही की ते मला ओळखत नाही. माझी कलावंत म्हणून असलेली ओळखच पुरेशी आहे. लोकसभा निवडणुकीत माझा विचार होणार नसेल तर विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा विचार व्हावा, अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार नाही, असंही पुणेकर यांनी सांगितलं.

काँग्रेसकडून सुरेखा पुणेकर यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात होतं. पण पुण्याच्या जागेवरुन काँग्रेसचा घोळ बरेच दिवस सुरु राहिला. काँग्रेसने अखेर पुण्यातून पक्षाचे नेते मोहन जोशी यांना उमेदवारी दिली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.