AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushama Andhare: सचिन अहिर फुटण्याची कुणकुण होती? सुषमा अंधारे यांनी सांगितली ती इनसाइड स्टोरी

Sushma Andhare on Sachin Ahir: सचिन अहिर यांनी शिंदे सेना जवळ केली. ते अचानक शिंदे गटात गेले .याविषयीची माहिती ठाकरे सेनेच्या नेत्यांना होती का? सुषमा अंधारे यांनी काय दिली माहिती?

Sushama Andhare: सचिन अहिर फुटण्याची कुणकुण होती? सुषमा अंधारे यांनी सांगितली ती इनसाइड स्टोरी
सुषमा अंधारे, सचिन अहिर
| Updated on: Jul 01, 2026 | 12:45 PM
Share

Sushma Andhare on Sachin Ahir: सचिन अहिर हे शिंदे सेनेत जाणार असल्याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता. सचिन अहिर फुटण्याची ठाकरे सेनेच्या नेत्यांना कुणकुण लागली होती का? उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्याशी फुटण्यापूर्वी पक्षीय कामासंदर्भात दोन तीन वेळा संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना ते फुटणार याची कुणकुण लागली होती का? सचिन अहिर हे शिंदे सेनेत गेले, त्यावर सुषमा अंधारे यांनी मोठे भाष्य केले आहे.

अहिर जाण्याची कुणकुण?

सचिन अहिर हे शिंदे सेनेत जाणार का? याची माहिती ठाकरे सेनेतील लोकांना नव्हती हे सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेतून समोर आली आहे. “दोन दिवसांपूर्वीही आमचं बोलणं झालेले होतं. २८ तारखेला आमचं बोलणं झालं होतं. २९ तारखेला एका कामानिमित्त भेट होणार होती. वटसावित्री पौर्णिमा असल्याने भेट झाली. ३० तारखेला भेटूयात असं ठरलं. कालही त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. काल साधारणता ११ वाजता आम्ही भेटणार असं ठरलं होतं. पण पाऊस आणि ट्रॅफिकमुळे मला पोहचायला उशीर झाला. त्यानंतर ते शिंदे सेनेत गेल्याची बातमी माध्यमांतून आम्हाला कळाली. पण जेव्हा त्यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी एकाही शब्दाने त्याची कल्पना दिली नव्हती.” अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

पक्ष सोडल्यानंतर अहिर यांची काय प्रतिक्रिया?

हे सर्व झाल्यावर मी त्यांना काल संध्याकाळी बोलण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला हवी होती असं मी त्यांना म्हणाले. लोक प्रश्न विचारतात. त्यांच्या मनात शंका येणं स्वाभाविक असतं. ते पुण्याचे संपर्क प्रमुख राहिलेले आहे. पुण्याचा आणि त्यांचा एक संपर्क आहे. आम्हाला अधिकची माहिती असेल असं अनेकांना वाटू शकतं. ते म्हणालं की सगळ काही खूपच अचानक घडलं. १८ ते २० तासात या घडामोडी घडल्या, असं त्यांनी सांगितल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

पण अब्दुल सत्तार यांचं एक वक्तव्य बरंच काही सांगून जातं. सहा खासदार फोडीमध्ये अहिर यांचा सर्वात मोठा सहभाग होता. त्यामुळे त्यांना उपसभापती करणं गरजेचे होतं. त्यामुळे आमच्यासारख्या शिवसैनिकांचा गोंधळ उडणं स्वाभाविक होतं.

मला त्यांनी पक्षाबाहेर पडण्याविषयीची कुणकुण लागण्याचे काही कारण नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सोनीग्रा नावाचे एक विकासक आहेत. त्याअनुषंगाने एक लक्षवेधी लावलेली होती. त्याची कागदपत्रे सचिन अहिर यांना द्यायचे होते. त्यामुळे मी आणि चेतन पवार त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कात होतो, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!