राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात ही भाजपची स्क्रीप्ट, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

पण, आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत. समोर अटकेची तलवार माहिती आहे.

राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात ही भाजपची स्क्रीप्ट, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 7:57 PM

मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आला. याबाबात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. संजय राऊत यांचं स्पिरीट आम्हाला माहीत आहे. समन्स, नोटिसा, कारवाई किंवा तुरुंगवास असला, तरी राऊत यांचं स्पिरीट कशानंही झुकणार नाही. थांबणार नाही. ते लढत राहणार आहेत. त्यांच्याविरोधात प्रचंड कट रचले जात आहेत. संजय राऊत कशात अडकू शकतात. यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पण, आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत. समोर अटकेची तलवार माहिती आहे. कारवाया काय होऊ शकतात. काय खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जाऊ शकतात. सगळ्या कल्पना आहे. तरीही आम्ही लढणार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितलं.

राज्यपालांच्या विरोधात सगळीकडून टिकेची राड उठवली जाते. त्यामुळं राज्यपालांना पायउतार व्हावचं लागेल. त्यामुळं भाजप आता कांगावा करत आहे. राज्यपाल यांनी स्वतः पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात इच्छा नाही. राज्यपालांना जाणेचं आहे. त्यांना पायउतार व्हावचं लागणार आहे.

राज्यपालांना पायउतार होण्याची नामुष्की टाळण्यासाठी राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात, अशी एक नवी स्क्रीप्ट भाजपकडून रचली जात आहे. पण, ती स्क्रीप्ट महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

बावनकुळे म्हणाले, राज्यपालांना टार्गेट केले जाते असं म्हणतात. मग, बावनकुळे साहेब राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे समजत आहेत का. बावनकुळे यांच्यासाठी पक्षांधपणा इतका वाढलाय. शिवाजी महाराज यांनी देशासमोर शौर्याची नवी उदाहरणं ठेवली. शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर ते शांत बसतात. राज्याच्या विचारधारेशी काहीचं देणंघेणं नाही, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.