AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराला ठाकरे सरकारची मंजुरी

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे 'नाना शंकरशेठ टर्मिनस' स्टेशन असे नामकरण करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली Mumbai Central Station Rename

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराला ठाकरे सरकारची मंजुरी
| Updated on: Mar 13, 2020 | 8:03 AM
Share

मुंबई : प्रभादेवीनंतर मुंबईत पश्चिम रेल्वेवरील आणखी एका स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. लोकल आणि एक्स्प्रेसच्या वाहतुकीमुळे प्रवाशांनी गजबजलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्यात येणार आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या नावाने हे स्थानक आता ओळखले जाईल. (Mumbai Central Station Rename)

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असे नामकरण करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. शिवसेनेने ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उचलून धरली होती. केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे नाव प्रत्यक्षात येईल.

आतापर्यंत ‘एल्फिन्स्टन रोड’चे प्रभादेवी, व्हीटी (व्हिक्टोरिया टर्मिनस)चे ‘सीएसटी’ (1995 ते 1999 दरम्यान शिवसेना-भाजप युतीकाळात) आणि नंतर ‘सीएसएमटी’ अर्थात ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण करण्यात आलं आहे.

नानांचं मूळ नाव ‘जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे’. भारतातील पहिल्या रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’च्या पहिल्या संचालकांपैकी ते एक होते. त्यामुळेच त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही संबोधले जाते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या नाना शंकरशेठ यांचा मुंबई शहराच्या जडणघडणीत मोठा वाटा मानला जातो.

कोण आहेत नाना शंकरशेठ?

नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबईजवळच्या मुरबाडमध्ये एका सधन कुटुंबात झाला. नाना शंकरशेठ यांनी अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळवली होती. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्या हवाली करत असत. (Mumbai Central Station Rename)

अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी, या हेतूने नानांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांसाठी खर्च करुन टाकला.

हेही वाचा : अंधेरी स्टेशनवर एस्कलेटर अचानक उलट्या दिशेने, ऐन गर्दीत प्रवाशांमध्ये गोंधळ

1848 मध्ये नाना शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव अशा योजना अंमलात आणल्या. गॅस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेलाही चालना दिली.

शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी 2017 मध्ये लोकसभेत मुंबईतील इंग्रजी नावे असलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा मांडला होता. एल्फिन्स्टन रोडचे प्रभादेवी, मुंबई सेंट्रलचे नाना शंकरशेठ स्टेशन, चर्नी रोडचे गिरगाव, करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी असं नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 2018 मध्ये एल्फिन्स्टन रोडचे नाव बदलले.

Mumbai Central Station Rename

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.