सततच्या धमक्यांनी माझ्या जीवाला धोका, सरकारने मला सुरक्षा पुरवावी, विजय पगारे यांची मागणी

बहुचर्चित आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी माध्यमांसमोर आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केलीय. त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली.

सततच्या धमक्यांनी माझ्या जीवाला धोका, सरकारने मला सुरक्षा पुरवावी, विजय पगारे यांची मागणी
विजय पगारे

मुंबई : बहुचर्चित आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी माध्यमांसमोर आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केलीय. त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली. मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी मोठे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर त्यांना आता धमक्या येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे सुरक्षआ पुरविण्याची मागणी केली आहे.

आर्यन खान प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड सुनील पाटील यांनी विजय पगारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा त्यांचा आरोप आहे. सुनील पाटील यांच्याकडून मला आणि माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कुटुंबाला आणि स्वतः मला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली आहे.

आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट, विजय पगारे यांचा दावा

आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यनवरील कारवाई ठरवून केली गेलीय. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोझा, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100 टक्के डील झाली होती, असा दावा पगारे यांनी केलाय.

समीर वानखेडे यांचा रोल किती? विजय पगारे म्हणतात…

आर्यन खान प्रकरणात झालेल्या डीलमध्ये समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर त्याबाबत मी खात्रीशिरपणे काही सांगू शकत नाही. पण भानुशालीने बोलता बोलता एकदोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. वानखेडे साब से बात हुथी क्या, वानखेडे साहबसे बात हुई थी क्या असं तो बोलत होता, असं विजय पगारे यांनी सांगितलं.

‘गोसावीच्या सेल्फीमुळे डील रद्द झाली’, विजय पगारेंचा सर्वांत मोठा गौप्यस्फोट

सुनील पाटीलने 5 तारखेला मला तो विषय सांगितला. ते केपी गोसावीबरोबर बोलत होते. केपी पैसे परत कर म्हणून सांगत होते. केपी म्हणाले. माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. 38 लाख पाठवून दिले. चार पाच लाखाची व्यवस्था करतोय, ते पाठवून देतो असं केपी गोसावी म्हणाले. सुनील संतापून बोलत होते. तुझ्या सेल्फीमुळे आणि तुझ्या चरबीमुळे संपूर्ण डील फेल झाली. तुला सेल्फीची चरबी चढली होती. तुझ्या सेल्फीमुळे आपले 18 कोटी गेले. माझे काय हाल झालेत, मी काय भिकारी झालो. माझ्या समोर देणेकरी बसलेत. मला पैसे द्यायचे आहेत. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली, असं सुनील पाटील हे केपी गोसावी बोलत होते.

(Thackeray government should give me security, demands Vijay Pagare over Aryan Khan Drugs Case)

हे ही वाचा :

आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI