AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेमुळे ठाकरे गटाला या 6 जागांवर फायदा, तर आदित्य ठाकरे ही पराभूत झाले असते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले नसले तरी अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांना फायदा झाला. मनसेचा उमेदवार जर या ठिकाणी रिंगणात नसता तर मुंबईतच उद्धव ठाकरेंच्या 10 जागा कमी झाल्या असत्या. सध्या हा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे.

मनसेमुळे ठाकरे गटाला या 6 जागांवर फायदा, तर आदित्य ठाकरे ही पराभूत झाले असते?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 25, 2024 | 6:39 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्यात एकही जागा मिळाली नाही. पण अनेक ठिकाणी त्यांना चांगलं मतदान झालं. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे माहीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मनसेच्या उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आणि उद्धव ठाकरे गटाने उमेदवार निवडून आले. राज्यातील 6 जागांवर मनसेच्या उमेदवारांना हजारो लोकांना मतदान केले. पण त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार काही हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. मनसेने मुंबईतील 36 पैकी 25 जागांवर उमेदवार उभे केले होते.

कुलाबा, वांद्रे पश्चिम, मालाड पश्चिम, मुलुंड, अंधेरी पश्चिम, मलबार हिल, सायन कोळीवाडा या सात जागांवर मनसेने उमेदवार उभे केले नाहीत, जिथे भाजपचे ज्येष्ठ नेते निवडणूक लढवत होते. मात्र, पक्षाने भाजपच्या विरोधात 10 तर शिंदे सेनेच्या विरोधात 12 जागांवर उमेदवार दिले होते.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भगव्या प्रेमामुळे शिवसेना-भाजपचे नुकसान झाले. मुस्लिमांची मते महाविकास आघाडीकडे गेली आणि त्यामुळे ठाकरे गटाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मनसेच्या उमेदवारांमुळे मुंबईत 10 जागा गमावल्याचा शिवसेनेचा दावा आहे, ज्यात वणी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोन्वा, कलिना, वांद्रे पूर्व, माहीम, वरळी आणि गुहागर यांचा समावेश आहे. त्यामुळे दिंडोशीतून संजय निरुपम आणि वरळीतून मिलिंद देवरा यांचाही चुरशीच्या लढतीत पराभव झाला.

वरळीत मिलिंद देवरा यांचा सामना उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याकडून पराभव झाला. या जागेवर मनसेचे संदीप देशपांडे यांना 19367 मते मिळाली. आदित्य ठाकरे यांचा केवळ 8801 मतांनी विजय झाला. दिंडोशीमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम यांचा ६१८२ मतांनी पराभव झाला. येथे मनसेचे उमेदवार बालचंद्र अंबुरे यांना 12805 मते मिळाली. मिलिंद देवरा यांनी राज ठाकरेंचा पक्ष मनसेने यूबीटीची बी टीम म्हणून काम केल्याचा आरोप केलाय. माहीमच्या जागेवर अमित ठाकरे यांना 33 हजार मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले पण शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना अवघ्या 1,316 मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

मतदारसंघ ठाकरे गटाचा किती फरकाने विजय मनसेची मतं
दिंडोशी 6,182 20,309
जोगेश्वरी ईस्ट 1,541 64,239
वांद्रे ईस्ट 11,365 16,074
वणी 15,560 21,977
माहीम 1,316 33,062
विक्रोळी 15,526 16,813
वरळी 8,801 19,367
वर्सोवा 1,600 6,752
कलिना 5,008 6,062
गुहागर 2,830 6,712

विक्रोळीत मनसेच्या उमेदवाराला 16,813 मते मिळाली तर UBT उमेदवार 15526 मतांनी विजयी झाला. जोगेश्वरी पूर्वमध्ये शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत झाली. ही जागा ठाकरे गटाने केवळ 1541 मतांनी जिंकली. येथे मनसेच्या उमेदवाराला 64 हजार मते मिळाली.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा