AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा मोठा निर्णय

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली (Arun Gawli life imprisonment) आहे.

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा मोठा निर्णय
| Updated on: Dec 09, 2019 | 12:43 PM
Share

मुंबई :  शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली (Arun Gawli life imprisonment) आहे. या खून खटल्यात एकूण 11 आरोपी आहेत. या खटल्यात अरुण गवळी आणि इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. (Arun Gawli life imprisonment)

या याचिकांवर तीन महिन्यापूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. आज या प्रकरणात कोर्टाने इन चेंबर निकाल सांगितला. यावेळी कोर्टाने अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवत असल्याचं म्हटलं आहे. या खटल्यात मोक्का कायदा लावण्यात आला होता. काहींवरील मोक्का कोर्टाने हटवला आहे.

डॉन अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

काय आहे कमलाकर जामसांडे कर हत्या प्रकरण?

नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरण 2007 मधील आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केल्याचा आरोप आहे.

कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुरवे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिवने अरुण गवळीच्या गँगमधील 2 व्यक्तींना जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हे करण्यासाठी 30 लाखांची सुपारी मागितली. सदाशिवने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले.

गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या दुसऱ्या साथीदाराकडे दिले. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी त्यांनी प्रत्येकी 20 हजार रुपये अॅडव्हान्सही दिला.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार गिरीने अशोक कुमार जायसवार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसांडेकरांवर लक्ष ठेवले. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली.

गवळीला या घटनेनंतर 1 वर्षांनी पकडण्यात आले. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

संबंधित बातमी : 

‘या’ कारणासाठी कुख्यात डॉन अरुण गवळीकडून दगडी चाळीत कार्यकर्त्यांचा मेळावा

गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचा महायुतीला पाठिंबा

मोदींवर टीका झाल्यावर वाईट वाटतं, अरुण गवळीच्या पत्नीकडून मोदींची स्तुती

निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी दगडी चाळीत परतणार

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.