आकडे लावायची सवय राऊतांना….भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल
Navnath Ban criticized Opposition: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. महिला विरोधकांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारही त्यांनी दिला.

Navnath Ban criticized Opposition: भाजपच्या मोर्चामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या, असा हल्लाबोल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नारीशक्ती तुम्हाला धडा शिकवणार असा इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत यांनी एका जातीचा उल्लेख करत हिनवले आहे असे म्हणत त्यांनी राऊतांवर जहरी टीका केली. आज त्यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका हिरारीने मांडली. त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
वडेट्टीवारांवारांना सडेतोड उत्तर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर आज घणाघाती टीका केली. त्यांनी भाजपच्या मोर्चावर टीका केली. त्याचा समाचार बन यांनी घेतला. जनतेने त्यांना चंदन लावल्याचा पलटवार वडेट्टीवार यांच्यावर केला. महिलांना सभागृहात जाण्यापासून तुम्ही रोखलं आहे. राहुल गांधींना यामुळेच जनतेने चंदन लावले आहे. नारीशक्ती कुणाच्या बाजूने आहे हे विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट झालं. नारीशक्तीने देवाभाऊला साथ दिलेली आहे. जन आक्रोश मोर्चामुळे यांच्या कानठळ्या बसल्या. महिलांची एकता बघून यांची पळता भुई थोडी झाली. भाजप हा नारीशक्तीचा पक्ष आहे. पैसे देऊन लोक तुम्हाला बोलवावे लागतात. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये ही यांची मानसिकता असल्याची टीका नवनाथ बन यांनी काँग्रेससह विरोधकांवर केली आहे.
संजय राऊतांवर जहाल टीका
संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका केली. त्याचा चांगलाच समाचार बन यांनी घेतला. संजय राऊत यांना पाकिस्तानरत्न आणि अर्धवटरत्न पुरस्कार दिला पाहिजे, अशी जहाल टीका त्यांनी केली. जर महिला आरक्षणाला पाठिंबा दिला असता तर आम्ही तुमचं अभिनंदन केलं असत. महिलांकडे सत्ता गेली तर भ्रष्टाचार करता येणार नाही, संजय राऊत यांना राज्यसभा मिळणार नाही म्हणून त्यांनी महिला विधेयकाला विरोध केला. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये ही यांची मानसिकता असल्याचा आरोप बन यांनी विरोधकांवर केला.
मोदी कुणाला घाबरवत नाही, जनता तुम्हाला घाबरवते आहे. जेव्हा नारीशक्ती जागी होते तेव्हा भल्याभल्यांना मागे जावं लागतं. कालच्या प्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा मोर्चा निघणार आहे. आकडे लावायची सवय संजय राऊत यांना आहे. खरात बाबाचे आणि कुणाचं संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. आम्ही नारीशक्तीचा सन्मान करतो, आम्ही खरातला बेड्या ठोकल्या. विधेयकात खोडा घालायचे काम इंडिया आघाडीने केलं. मल्लिकार्जुन खर्गे यांचं समर्थन राऊतांनी केलं. दहशतवादी कोण आहेत ते सर्वांनी पाहिलं. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे काम मोदींच्या सरकारने केलं. जनतेचा मोदींवर भक्कम विश्वास आहे असे बन म्हणाले. नाशिक प्रमाणे पुण्यातही कारवाई होईल. जिहादी प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, याला संजय राऊत यांच्यासारखे लोक साथ देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुण्यातही कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.