विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत

तिन्ही मुलं विरार डोंगरपाडा येथील असून तिघेही दारु पिऊन समुद्रात उतरले असल्याचे जीवरक्षकाने सांगितले.

विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 12:41 PM

विरार : विरारमधील समुद्रात बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकाने प्राण धोक्यात घालून वाचवले. मात्र दारुच्या नशेत समुद्रात उतरलेल्या तिघांची भलतीच अरेरावी पाहायला मिळाली. कारण या तिघांनी आपला जीव वाचवणाऱ्या देवदूताशीच हुज्जत घातली. (Three Men saved from drowning in Virar Rajodi Sea)

स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी 06:15 ते 06:30 वाजताच्या सुमारास विरारमधील राजोडीच्या खोल समुद्रात हे तिघे तरुण पोहत होते. राजोडी वॉचटॉवर येथून दक्षिण दिशेला 500 मीटर अंतरावर हे तिघे होते. जीवरक्षक चारुदत्त मेहेर धावत खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात गेले. प्रसंगावधान दाखवत मेहेर यांनी तिघाही तरुणांना सुरक्षित बाहेर काढले.

समुद्रातून बाहेर काढल्यानंतर दारूच्या नशेत तरुणांनी जीवरक्षकाशीच हुज्जत घातली. आपले प्राण वाचवल्याबद्दल आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करणे राहिले दूरच उलट त्यांनी या देवदूतावरच अरेरावी केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचा डाव, पोलिसांची गाडी पाहून क्रिकेटपटूंच्या समुद्रात उड्या

तिन्ही मुलं विरार डोंगरपाडा येथील असून तिघेही दारु पिऊन समुद्रात उतरले असल्याचे जीवरक्षकाने सांगितले. प्रसंगावधान राखल्याने तिघांचाही जीव वाचला. राहुल पाटील, प्रदीप झा, शुभम झा अशी या तरुणांची नावे आहेत.

दरम्यान, अरेरावी करणाऱ्या एका तरूणाला स्थानिक नागरिकांनी चोपही दिला. मात्र जीवरक्षक प्रसंगावधान दाखवून वेळेवर पोहचले नसते, तर यातील एखादा तरुण जीवास मुकला असता, असे बोलले जात आहे.

गेल्याच महिन्यात तरुणांचा ग्रुप अर्नाळा समुद्र किनारी क्रिकेट खेळत होता. मात्र अचानक सागरी पोलिसांनी या भागात एंट्री केली आणि त्यांची भंबेरी उडाली. तरुणांनी हातातील बॅट जागीच सोडून धूम ठोकली. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही जणांनी चक्क समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर पोहत पोहत या तरुणांनी होडीचा आधार घेत पोलिसांपासून पडणारा मार वाचवला. (Three Men saved from drowning in Virar Rajodi Sea)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.